IPL 2024 RCB vs DC Live । बंगळुरू : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ६२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आहेत. आरसीबीचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीसाठी आजचा सामना ऐतिहासिक असणार आहे. कारण एका फ्रँचायझीकडून सर्वाधिक (२५०) सामने खेळणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत त्याने आरसीबीच्या फ्रँचायझीसाठी एकूण २४९ सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पाचव्या तर आरसीबी सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्हीही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. (IPL 2024 News)
आजच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचा नियमित कर्णधार रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आल्याने तो बंगळुरूविरूद्धच्या सामन्याला मुकला. खरे तर आरसीबीने आजचा सामना गमावल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
RCB साठी 'विराट' कामगिरी
- सामने - २४९
- इनिंग्ज - २४१
- धावा - ७८९७
- सरासरी - ३८.७१
- स्ट्राईक रेट - १३१.६४
- अर्धशतके - ५५
- शतके - ८
- षटकार - २६४
- चौकार - ६९८
बंगळुरूचा संघ -फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, स्वप्निल सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.
दिल्लीचा संघ - अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेजर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, कुमार कुशाग्र, ट्रिस्टन स्टब्स, कुलदीप यादव, रसिख दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.