Join us  

महेंद्रसिंग धोनी IPL 2024 खेळणार! CSKने ८ खेळाडूंना करारमुक्त केले, ३२.६० कोटी वाचवले 

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला लिलाव पार पडणार आहे. त्याआधी आज १० फ्रँचायझीच्या रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 4:19 PM

Open in App

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला लिलाव पार पडणार आहे. त्याआधी आज १० फ्रँचायझीच्या रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यात आली. चेन्नई सुपर किंग्सने २०२२मध्ये जेतेपद उंचावताना आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ जेतेपदांच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली होती. महेंद्रसिंग धोनीचा ती शेवटची आयपीएल असल्याची हवा मागील हंगामात झाली होती. पण, धोनीने तशी कोणतीच घोषणा केली नाही आणि आज CSKच्या रिटेन लिस्टमध्ये त्याचं नाव दिसल्याने चाहते आनंदीत झाले. महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२४ खेळणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले. चेन्नईने ८ खेळाडूंना रिलीज केले आहे. 

- शाहबाज अहमद हा RCB कडून सनरायझर्स हैदराबादकडे गेला आहे. त्याच्याजागी SRHने मयांक डागरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे सोपवले आहे - राजस्थान रॉयल्सने आवेश खानला आपल्या ताफ्यात घेताना देवदत्त पडिक्कलला लखनौ सुपर जायंट्सला दिले आहे.- लखनौ सुपर जायंट्सकडून रोमारिओ शेफर्डला मुंबई इंडियन्सने घेतले आहे. - चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्स ( १६.२ कोटी) , ड्वेन प्रेटोरियस( ५० लाख) , कायले जेमिन्सन ( १ कोटी), आकाश सिंग ( २० लाख), अंबाती रायुडू ( ६.७ कोटी), सिसांडा मगाला( ५० लाख) , भगत वर्मा ( ३० लाख) व शुभ्रांशू सेनापती ( २० लाख) यांना रिलिज केले आहे 

 चेन्नई सुपर किंग्सने कायम राखलेले खेळाडू ( CSK Retained players list) - महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराणा, समिरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, महीष थीक्षणा, अजिंक्य रहाणे,  शेख राशीद, निशांत सिंधू, अजय मंडल ( MS Dhoni, Ravindra Jadeja, Devon Conway, Ruturaj Gaikwad, Moeen Ali, Shivam Dube, Rajvardhan Hangargekar, Mitchell Santner, Deepak Chahar, Tushar Deshpande, Matheesha Pathirana, Simarjeet Singh, Prashant Solanki, Maheesh Theekshana, Ajinkya Rahane, Shaik Rasheed, Nishant Sindhu, Ajay Mandal) 

 

टॅग्स :आयपीएल २०२३आयपीएल लिलावचेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी