गौतम गंभीर येताच झाली काट छांट! शार्दूलसह १३ खेळाडूंना घरचा रस्ता, १२ जणांना राखले कायम

IPL 2024 Retention:  कोलकाता नाइट रायडर्सने त्यांचा स्टार खेळाडू शार्दूल ठाकूरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 05:08 PM2023-11-26T17:08:08+5:302023-11-26T17:08:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Retention: Gautam Gambhir impact : Kolkata Knight Riders released 13 players &  retained 12 players | गौतम गंभीर येताच झाली काट छांट! शार्दूलसह १३ खेळाडूंना घरचा रस्ता, १२ जणांना राखले कायम

गौतम गंभीर येताच झाली काट छांट! शार्दूलसह १३ खेळाडूंना घरचा रस्ता, १२ जणांना राखले कायम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Retention:  कोलकाता नाइट रायडर्सने त्यांचा स्टार खेळाडू शार्दूल ठाकूरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.  गेल्या मोसमात 7व्या क्रमांकावर असलेल्या KKRचा IPL 2024 मध्ये नवीन सुरुवात करण्याचा मानस आहे आणि या मालिकेत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी गौतम गंभीरला संघाचा मार्गदर्शक बनवले आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली KKR बदलाच्या दिशेने पाऊल टाकत आहेत.  शार्दूलसह शाकिब अल हसन अशा १३ खेळाडूंना करारमुक्त केले गेले आहे आणि शार्दूलसाठी केकेआरने गेल्या मोसमात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा ट्रेड केला होता.

राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी; जेसन होल्डरसह ९ खेळाडू करारमुक्त, बघा कोणाला कायम ठेवले 


कोलकाता नाइट रायडर्सने कायम राखलेले खेळाडू – नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, सुनील नारायण, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती. ( Nitish Rana, Rinku Singh, Rahmanullah Gurbaz, Shreyas Iyer, Jason Roy, Suyash Sharma, Sunil Narine, Anukul Roy, Andre Russell, Venkatesh Iyer, Harshit Rana, Vaibhav Arora, Varun Chakaravarthy) 


कोलकाता नाइट रायडर्सने रिलीज केलेले खेळाडू - शाकिब अल हसन, लिटन दास, आर्य देसाई, डेव्हिड वीस, नारायण जगदीशन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दूल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊदी, जॉन्सन चार्ल्स. ( Shakib Al Hasan, Litton Das, Aarya Desai, David Wiese, Narayan Jagadeesan, Mandeep Singh, Kulwant Khejroliya, Shardul Thakur, Lockie Ferguson, Umesh Yadav, Tim Southee,Johnson Charles ) 


२०१२ व २०१४ गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. २०२१ मध्ये ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. २०२२ आणि २०२३ मध्ये, संघ लीग स्टेजमधून बाहेर पडला. दोन्ही वेळा १० संघांमध्ये सातव्या क्रमांकावर होता. केकेआरने २०२२ च्या मेगा लिलावात अनेक मोठे निर्णय घेतले होते. मेगा लिलावापूर्वी, केकेआरने इऑन मॉर्गन, स्टार खेळाडू शुभमन गिल आणि दिनेश कार्तिक यांना सोडले होते, ज्यांनी संघाला अंतिम फेरीत नेले होते.  

Web Title: IPL 2024 Retention: Gautam Gambhir impact : Kolkata Knight Riders released 13 players &  retained 12 players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.