IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला लिलाव पार पडणार आहे आणि त्यासाठी रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख आहे. चेन्नई सुपर किंग्सने २०२२मध्ये जेतेपद उंचावताना आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ जेतेपदांच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली होती. CSKने ८ खेळाडूंना रिलीज केले आहे. राजस्थान रॉयल्सनेही ९ खेळाडूंना रिलीज केले आहे.
महेंद्रसिंग धोनी IPL 2024 खेळणार! CSKने ८ खेळाडूंना करारमुक्त केले, ३२.६० कोटी वाचवले
राजस्थान रॉयल्सने रिलीज केलेले खेळाडू - जो रूट, अब्दुल बसिथ, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेड मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी चरिअप्पा, केएम आसीफ( Joe Root, Abdul Basith, Jason Holder, Akash Vashisht, Kuldip Yada, Obed McCoy, Murugan Ashwin, KC Cariappa, KM Asif)
- चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्स ( १६.२ कोटी) , ड्वेन प्रेटोरियस( ५० लाख) , कायले जेमिन्सन ( १ कोटी), आकाश सिंग ( २० लाख), अंबाती रायुडू ( ६.७ कोटी), सिसांडा मगाला( ५० लाख) , भगत वर्मा ( ३० लाख) व शुभ्रांशू सेनापती ( २० लाख) यांना रिलिज केले आहे