हैदराबाद : दिल्लीकडून पराभव पत्करणारा चेन्नई संघ आयपीएल १७मध्ये शुक्रवारी हैदराबाद संघाविरुद्ध वेगवान मुस्तफिझूर रहमान याच्या अनुपस्थितीत विजयासाठी दोन हात करणार आहे. हैदराबादने लीगमधील सर्वोच्च २७७ ही धावसंख्या याच मोसमात नोंदविली. दुसरीकडे, चेन्नईचा सर्वांत अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी याने वरच्या स्थानावर फलंदाजीला यावे, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
हैदराबाद - स्थानिक मैदानावर खेळण्याचा लाभ होईल. मयंक अग्रवाल मात्र अपयशी ठरला. गुजरातविरुद्ध मात्र या संघाचे फलंदाज अपयशी ठरले होते.- जयदेव उनाडकट, मयंक मार्कण्डेय, भुवनेश्वर कुमार गोलंदाजीत महागडे ठरले. भुवीने नव्या चेंडूवर निराश केले. कर्णधार पॅट कमिन्सने मात्र चांगला मारा केला आहे.
चेन्नई- शिवम दुबे, समीर रिझवी फिनिशरच्या भूमिकेत. कर्णधार ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र यांच्यासह धोनीकडून धावांचा धडाका होण्याची अपेक्षा.- मथीषा पथिरानाच्या जोडीला मुकेश चौधरी हा मुस्तफिझूरचे स्थान घेऊ शकतो. एकही सामना न खेळलेला शार्दुल ठाकूर याला संधी मिळू शकेल.