IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi Updates - लखनौ सुपर जायंट्सच्या युवा गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्या घरच्या मैदानावर नांग्या टेकायला लावल्या. मयांक यादवच्या ( Mayank Yadav ) च्या वेगाने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धींना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. देवदत्त पडिक्कल फलंदाजीत अपयशी ठरला असला तरी त्याने भन्नाट थ्रो करून फॅफ ड्यू प्लेसिसला रन आऊट केले आणि RCB चे ग्रह फिरले. त्यानंतर त्यांना संघर्ष करूनही पराभव टाळता आला नाही.
LSG चा युवा जोश, उडाले RCB चे होश! देवदत्त पडिक्कलचा भन्नाट थ्रो अन् मयांक यादवचा वेगवान मारा, Video
विराट कोहली व फॅफ यांनी RCB ला चांगली सुरुवात करून देताना ४.२ षटकांत ४० धावा फलकावर चढवल्या. मणिमारन सिद्धार्थने LSG ला पहिला धक्का देताना विराटची ( २२) विकेट मिळवली. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात फॅफ ( १९) रन आऊट झाला. यादवने त्याच षटकात १५७ kmph च्या वेगाने चेंडू टाकून ग्लेन मॅक्सवलेला भोपळ्यावर बाद केले. त्यानंतर यादवने कॅमेरून ग्रीनचा भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवून RCBची अवस्था बिनबाद ४० वरून ४ बाद ५८ अशी केली. रजत पाटीदार व अनुज रावत यांनी काही काळ डाव सावरला होता. पण, अनुजला ( ११) एक जीवदान मिळूनही मोठी खेळी करता आला नाही. पाटीदार ( २९) संघर्ष करत होता, परंतु मयांकच्या वेगासमोर तोही फसला अन् पडिक्कलने सुरेख झेल घेतला.