IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांची नाव बुडायला आली आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये प्ले ऑफचे आव्हान टीकवण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येक सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील पराभूत संघ हा मुंबई इंडियन्सनंतर प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाणार आहे.
Milestones Alert:
- दिनेश कार्तिकला ट्वेंटी-२०त बळींचं त्रिशतक पूर्ण करण्यासाठी दोन बळी टिपावे लागतील
- राशिद खानने ३ विकेट्स घेतल्यास तो आयपीएलमध्ये दीडशे विकेट्सचा टप्पा गाठेल
- वृद्धीमान साहाने चार चौकार खेचल्यास तो या लीगमध्ये चौकारांचे त्रिशतक पूर्ण करेल
- विराट कोहलीला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १२५०० धावा पूर्ण करण्यासाठी ६ धावांची गरज आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेल ( १४५६२), शोएब मलिक ( १३३६०) व किरॉन पोलार्ड ( १२९००) हे विराटच्या पुढे आहेत.
- फॅफ ड्यू प्लेसिसला ट्वेंटी-२०त १०००० धावा पूर्ण करण्यासाठी २५ धावा हव्या आहेत.
RCB ला १० सामन्यांत ३, तर GT ला १० सामन्यांत ४ विजय मिळवता आले आहेत. RCB ने नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस याने टॉस जिंकल्यावर तो कॅमेरासमोर धरला. मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकात वृद्धीमान साहा ( १) याला बाद केले. सिराजने त्याच्या पुढच्या षटकात शुबमन गिल ( २) यालाही तंबूत पाठवून GT ला मोठा धक्का दिला. कॅमेरून ग्रीनने त्याच्या पहिल्या षटकात साई सुदर्शनला ( ६) चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले आणि विराट कोहलीने सोपा झेल टिपला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये गुजरातने २३ धावांत ३ विकेट्स गमावल्या. यंदाच्या पर्वातील ही आयपीएलमधील सर्वात खराब कामगिरी ठरली. यापूर्वी पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३ बाद २७ धावा केल्या होत्या.