विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video

RCB ला १० सामन्यांत ३, तर GT ला १० सामन्यांत ४ विजय मिळवता आले आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 09:58 PM2024-05-04T21:58:17+5:302024-05-04T21:58:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi : Virat Kohli has completed 12500 runs in T20 cricket with a six, Anushka Sharma's reaction after Virat six, Video  | विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video

विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi :  RCB ला १० सामन्यांत ३, तर GT ला १० सामन्यांत ४ विजय मिळवता आले आहेत.  त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. पण, सद्यस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारलेली दिसतेय. गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीनंतर विराट कोहली  व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी दमदार सुरुवात करून दिली आहे. 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये टीकून राहण्यासाठी प्रत्येक मॅच जिंकणे महत्त्वाचे आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध आज RCB ने उत्तम सांघिक कामगिरी करून दाखवली. मोहम्मद सिराज ( २-२९), यश दयाल ( २-२१) यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. विराट कोहलीने एक भन्नाट रन आऊट करून सामन्याला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. विजयकुमार वैशाखने ( २-२३) २०व्या षटकात सलग ३ विकेट मिळवून दिल्या. त्यापैकी एक रन आऊट असल्याने त्याची हॅटट्रिक नाही झाली.  गुजरातचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत १४७ धावांत तंबूत परतला. GT कडून मोहम्मद शाहरुख खान ( ३७), डेव्हिड मिलर ( ३०) व राहुल तेवाटिया ( ३५) यांनी चांगला खेळ केला.  


विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ४ षटकांत ६४ धावा करताना मॅच एकतर्फी केली. विराटने षटकारने त्याचे खाते उघडले आणि मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या लढतीपूर्वी विराटला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १२५०० धावा पूर्ण करण्यासाठी ६ धावांची गरज होती आणि षटकाराने त्याने हा टप्पा ओलांडला. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेल ( १४५६२), शोएब मलिक ( १३३६०) व किरॉन पोलार्ड ( १२९००) हे विराटच्या पुढे आहेत. विराटचा षटकार पाहून अनुष्का शर्मा थक्क झाली. 

 

Web Title: IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi : Virat Kohli has completed 12500 runs in T20 cricket with a six, Anushka Sharma's reaction after Virat six, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.