IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये टीकून राहण्यासाठी प्रत्येक मॅच जिंकणे महत्त्वाचे आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध आज RCB ने उत्तम सांघिक कामगिरी करून दाखवली. मोहम्मद सिराज, यश दयाल यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. विराट कोहलीने एक भन्नाट रन आऊट करून सामन्याला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. विजयकुमार वैशाखने २०व्या षटकात सलग ३ विकेट मिळवून दिल्या. त्यापैकी एक रन आऊट असल्याने त्याची हॅटट्रिक नाही झाली.
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
RCB ने नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकात वृद्धीमान साहा ( १) याला बाद केले. सिराजने त्याच्या पुढच्या षटकात शुबमन गिल ( २) यालाही तंबूत पाठवून GT ला मोठा धक्का दिला. कॅमेरून ग्रीनने त्याच्या पहिल्या षटकात साई सुदर्शनला ( ६) चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले आणि विराट कोहलीने सोपा झेल टिपला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये गुजरातने २३ धावांत ३ विकेट्स गमावल्या. यंदाच्या पर्वातील ही आयपीएलमधील सर्वात खराब कामगिरी ठरली. यापूर्वी पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३ बाद २७ धावा केल्या होत्या. डेव्हिड मिलर व शाहरुख खान यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि १० षटकांत संघाला ६१ धावांपर्यंत पोहोचवले. ११व्या षटकात मिलरचा झेल कर्ण शर्माने टाकला. पण, कर्ण शर्माने त्याच्या गोलंदाजीवर विकेट मिळवली. मिलर २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३० धावांवर बाद झाला आणि त्याची शाहरुखसह ६१ धावांची भागीदारी संपुष्टात आली.