IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi Updates - क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) आणि निकोलस पूरन या डावखुऱ्या फलंदाजांनी आज कमाल केली. दोघांनी दमदार फटकेबाजी करून LSGला १८१ धावांपर्यंत पोहोचवले. शेवटच्या दोन षटकांत निकोलसचा वेडेपणा पाहायला मिळाला आणि त्याच्या उत्तुंग फटक्यांनी RCB ला हैराण केले. त्याने रिसे टॉप्लीला मारलेला षटकात १०६ मीटर लांब केला आणि तोही स्टेडियमच्या छतावर. हा त्याचा आयपीएलमधील १००वा षटकार ठरला आणि यासह त्याने ख्रिस गेल, हार्दिक पांड्या यांचा विक्रम मोडला.
ग्लेन मॅक्सवेलने ( ४-०-२३-२ ) RCBला दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. अनुज रावत व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या अफलातून झेल घेतले. क्विंटन डी कॉकने पहिल्या विकेटसाठी लोकेश राहुलसह ( २०) ५३ व तिसऱ्या विकेटसाठी मार्कस स्टॉयनिससह ( २४) ५६ धावांची भागीदारी केली. क्विंटन ५६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांवर माघारी परतला. यश दयालनेही चांगली गोलंदाजी करून लखनौच्या फलंदाजांना जखडून ठेवले. पण, निकोलस पूरनने शेवटच्या दोन षटकांत खणखणीत फटके खेचले. त्याने २१ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४० धाव चोपल्या आणि लखनौला ५ बाद १८१ धावांपर्यंत पोहोचवले.
२०१६ मध्ये RCB ने चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटच्या वेळेस १८०+ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. निकोलसने ८८४ चेंडूंत आयपीएलमध्ये १०० षटकारांचा टप्पा ओलांडला आणि आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंत षटकारांचे शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. आंद्रे रसेलने ६५७ चेंडूंत हा टप्पा ओलांडलेला, पूरनने आज ख्रिस गेल ( ९४३), हार्दिक पांड्या ( १०४६), किरॉन पोलार्ड ( १०९४), ग्लेन मॅक्सवेल ( ११२३), रिषभ पंत ( १२२४) व युसूफ पठाण ( १३१३) यांचा विक्रम मोडला.