LSG चा युवा जोश, उडाले RCB चे होश! देवदत्त पडिक्कलचा भन्नाट थ्रो अन् मयांक यादवचा वेगवान मारा, Video 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आघाडीच्या फलंदाजांना आज लखनौ सुपर जायंट्सच्या युवा गोलंदाजांसमोर नांग्या टाकाव्या लागल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:18 PM2024-04-02T22:18:06+5:302024-04-02T22:18:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi  - MAYANK YADAV bowled fastest delivery of this IPL 2024 (157 KMPH), First the catch and now an excellent direct-hit, Video  | LSG चा युवा जोश, उडाले RCB चे होश! देवदत्त पडिक्कलचा भन्नाट थ्रो अन् मयांक यादवचा वेगवान मारा, Video 

LSG चा युवा जोश, उडाले RCB चे होश! देवदत्त पडिक्कलचा भन्नाट थ्रो अन् मयांक यादवचा वेगवान मारा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi Updates - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आघाडीच्या फलंदाजांना आज लखनौ सुपर जायंट्सच्या युवा गोलंदाजांसमोर नांग्या टाकाव्या लागल्या. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी दमदार सुरुवात केली. पण, मणिमारन सिद्धार्थ व मयांक यादव या युवा गोलंदाजांनी कमाल केली. देवदत्त पडिक्कलच्या भन्नाट थ्रोवर फॅफला रन आऊट करून माघारी पाठवले. RCB चे चार फलंदाज ५२ धावांत तंबूत परतला. मयांक यादवने स्वतःचाच विक्रम मोडताना आयपीएल २०२४ मधील वेगवान चेंडू फेकला. 

Nicholas Pooran ने चेंडू पाठवला स्टेडियमच्या छतावर; मोडला गेल, हार्दिक, पोलार्ड यांचा विक्रम

क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) आणि निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीने LSGला १८१ धावांपर्यंत पोहोचवले. शेवटच्या दोन षटकांत निकोलसने उत्तुंग फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलने ( ४-०-२३-२ ) RCBला दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. अनुज रावत व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या अफलातून झेल घेतले. क्विंटन डी कॉकने पहिल्या विकेटसाठी लोकेश राहुलसह ( २०) ५३ व तिसऱ्या विकेटसाठी मार्कस स्टॉयनिससह ( २४) ५६ धावांची भागीदारी केली. क्विंटन ५६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांवर माघारी परतला.  पूरनने २१ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४० धाव चोपल्या आणि लखनौला ५ बाद १८१ धावांपर्यंत पोहोचवले. 


२०१६ मध्ये RCB ने चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटच्या वेळेस १८०+ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCB ला चांगली सुरुवात करून देताना ४.२ षटकांत ४० धावा फलकावर चढवल्या. मणिमारन सिद्धार्थने LSG ला पहिला धक्का देताना आयपीएलमधील पहिली विकेट ही विराटची ( २२) मिळवली. पडिक्कलने हा झेल घेतला. त्यानंतर मयांक यादवच्या गोलंदाजीवर फॅफ ड्यू प्लेसिसला स्मृतीभ्रंश झाल्याचे दिसले. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात तो रन आऊट झाला. पडिक्कलच्या अचूक थ्रोमुळे त्याला ( १९) माघारी पाठवले. यादवने त्याच षटकात १५७ kmph च्या वेगाने चेंडू टाकून ग्लेन मॅक्सवलेला भोपळ्यावर बाद केले. त्यानंतर यादवने कॅमेरून ग्रीनचा भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवला. 


Web Title: IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi  - MAYANK YADAV bowled fastest delivery of this IPL 2024 (157 KMPH), First the catch and now an excellent direct-hit, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.