IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi Updates - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आघाडीच्या फलंदाजांना आज लखनौ सुपर जायंट्सच्या युवा गोलंदाजांसमोर नांग्या टाकाव्या लागल्या. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी दमदार सुरुवात केली. पण, मणिमारन सिद्धार्थ व मयांक यादव या युवा गोलंदाजांनी कमाल केली. देवदत्त पडिक्कलच्या भन्नाट थ्रोवर फॅफला रन आऊट करून माघारी पाठवले. RCB चे चार फलंदाज ५२ धावांत तंबूत परतला. मयांक यादवने स्वतःचाच विक्रम मोडताना आयपीएल २०२४ मधील वेगवान चेंडू फेकला.
Nicholas Pooran ने चेंडू पाठवला स्टेडियमच्या छतावर; मोडला गेल, हार्दिक, पोलार्ड यांचा विक्रम
क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) आणि निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीने LSGला १८१ धावांपर्यंत पोहोचवले. शेवटच्या दोन षटकांत निकोलसने उत्तुंग फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलने ( ४-०-२३-२ ) RCBला दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. अनुज रावत व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या अफलातून झेल घेतले. क्विंटन डी कॉकने पहिल्या विकेटसाठी लोकेश राहुलसह ( २०) ५३ व तिसऱ्या विकेटसाठी मार्कस स्टॉयनिससह ( २४) ५६ धावांची भागीदारी केली. क्विंटन ५६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांवर माघारी परतला. पूरनने २१ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४० धाव चोपल्या आणि लखनौला ५ बाद १८१ धावांपर्यंत पोहोचवले.