Join us  

RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

IPL 2024, RR vs KKR Live Marathi : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 8:31 PM

Open in App

IPL 2024, RR vs KKR Live Marathi : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला आहे. RR ला क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे, परंतु मागील चार सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली आहे. तेच KKR ने १९ गुणांसह क्वालिफायर १मधील जागा पक्की केली आहे आणि त्यांना विजयी लय कायम राखायची आहे. SRH ने त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकून १७ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे आणि RR वरील दडपण वाढवले आहे. गुवाहाटी येथे KKR vs RR सामना होणार आहे, परंतु पावसामुळे ७.३० वाजता सुरू होणारी मॅच तास उलटूनही सुरू झालेली नाही. गुवाहाटी येथे मुसळधार पाऊस पडतोय आणि संपूर्ण स्टेडियम झाकलं गेलं आहे.

 

पहिल्या ८ सामन्यांत ७ विजय मिळवून राजस्थानने लीगची सुरुवात दणक्यात केली होती, परंतु मागील चार सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली आणि त्यांची गाडी अडकली. १३ सामन्यांत ८ विजय मिळवून १६ गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास KKR - RR यांना प्रत्येकी १ गुण दिला जाईल. त्यानंतर कोलकाताचे २० गुण होतील, हैदराबाद व राजस्थानचे प्रत्येकी १७ गुण होतील. मात्र, SRH चा नेट रन रेट हा ०.४१४ असा आहे, तर RR चा ०.२७३ असा.. त्यामुळे सरस नेट रन रेटच्या जोरावर SRH क्वालिफायर १ सामना खेळेल..

प्ले ऑफचं वेळापत्रक

  • २१ मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद ( क्वालिफायर १)
  • २२ मे - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, अहमदाबाद ( एलिमिनेटर )
  • २४ मे - क्वालिफायर १ मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, चेन्नई ( क्वालिफायर २)
  • २६ मे - क्वालिफायर १ मधील विजेता संघ वि. क्वालिफायर २ विजेता, चेन्नई ( फायनल)  

 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्स