Join us  

पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला

पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करताना RR ला दडपणात ठेवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 9:22 PM

Open in App

IPL 2024 RR vs PBKS Live Marathi - प्ले ऑफचे स्थान पक्के झाल्यानंतर क्वालिफायर १ साठी दावा सांगायला राजस्थान रॉयल्सचा संघ गुवाहाटी येथे अडखळला... पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करताना RR ला दडपणात ठेवले. रियान पराग आणि आर अश्विन यांनी RR च्या डावाला आकार दिला आणि PBKS समोर सन्मानजनक लक्ष्य उभे केले. रियानच्या ४८ धावांनी RR ला बळ मिळाले. 

संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जॉस बटलर राष्ट्रीय कर्तव्यासाठी इंग्लंडला परतल्याने RR ला मोठा झटका बसला आहे. यशस्वी जैस्वाल ( ४) याला सॅम करनने पहिल्याच षटकात माघारी पाठवून RR ला धक्का दिला. संजू सॅमसन व टॉम कोहलर-कॅडमोर यांना PBKS च्या गोलंदाजांनी शांत ठेवले होते आणि RR ला पॉवर प्लेमध्ये १ बाद ३८ धावाच करता आल्या. सातव्या षटकात नॅथन एलिसने स्लोव्हर बाऊन्सरवर संजू सॅमसनला ( १८) झेल देण्यास भाग पाडले. यंदाच्या पर्वात संजूने RR कडून ५००+ धावा केल्या आणि RR साठी एका पर्वात इतक्या धावा करणारा तो जॉस बटलर ( २०१८) याच्यानंतर दुसरा यष्टिरक्षक ठरला. RR साठी एका पर्वात सर्वाधिक धावा करणारा संजू हा पहिलाच नॉन ओपनर फलंदाज ठरला.  

आयपीएल इतिहासात तिसऱ्या क्रमांकावर ३०००+धावा करणारा संजू हा दुसरा फलंदाज बनला. सुरेश रैनाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक ४९३४ धावा केल्या आहेत. विराट कोहली ( २८१५), एबी डिव्हिलियर्स ( २१८८) यांना संजू सॅमसनने मागे टाकले. पुढच्याच षटकात चहरने RR चा दुसरा सलामीवीर कॅडमोर ( १८) यालाही बाद केले. आर अश्विन आणि रियान पराग यांनी अर्धशतकी भागीदारी करून RR डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु यांच्या धावांतही वेग नव्हता. ३३ चेंडूंत ५० धावांची ही भागीदारी अर्शदीप सिंगने तोडली. अश्विन १८ चेंडूंत २८ धावा करून परतला. 

ध्रुव जुरेल ( ०) व रोव्हमन पॉवेल ( ४) यांना अनुक्रमे सॅम करन व राहुल चहर यांनी माघारी पाठवून RR ला अडचणीत आणले. चहरने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.  १५ षटकांच्या आत ६ विकेट्स पडल्याने RR ला डोनोव्हन फरेराला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरवावे लागले, परंतु तो ७ धावांवर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. रियान ३४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४८ धावांवर पायचीत झाला. राजस्थानने ९ बाद १४४ धावा केल्या. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्स