राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले

पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये धक्कासत्र सुरू केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 11:11 PM2024-05-15T23:11:43+5:302024-05-15T23:13:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 RR vs PBKS Live Marathi -Will Rajasthan Royals dream of Qualifier 1 be shattered? Losing to Punjab Kings changed the playoffs equation | राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले

राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 RR vs PBKS Live Marathi - पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये धक्कासत्र सुरू केले. प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झालेल्या PBKS ने गुवाहाटीत राजस्थान रॉयल्सला पराभूत केले. सलग चौथ्या पराभवामुळे RR चे क्वालिफायर १ खेळण्याचे स्वप्न भंग होण्याच्या मार्गावर आले आहे. शेवटचे दोन सामने जिंकून RR ला २० गुणांसह क्वालिफायर १ मधील जागा पक्की करता येणार होती. पण, आजचा सामना गमवल्याने त्यांची गाडी १८ गुणांवर अडकू शकते. मग सनरायझर्स हैदराबादने उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास तेही १८ गुणांच्या जोरावर क्वालिफायर १ साठी दावा सांगतील आणि त्यांचा नेट रन रेट हा RR पेक्षा सध्यातरी उत्तम आहे. 


रियान पराग आणि आर अश्विन यांना PBKS समोर सन्मानजनक लक्ष्य उभे करता आले. पंजाबच्या गोलंदाजांनी चांगला मारा करताना राजस्थानला ९ बाद १४४ धावांवर रोखले. यशस्वी जैस्वाल ( ४), टॉम कोहलर-कॅडमोर ( १८), संजू सॅमसन ( १८) यांना मोठी खेळी करण्यापासून PBKS ने रोखले. अश्विन आणि पराग यांनी अर्धशतकी ३३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. अश्विन १८ चेंडूंत २८ धावा करून परतला.  रियानने ३४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. सॅम करन ( २-२५), हर्षल पटेल ( २-२८) व राहुल चहर ( २-२६) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


पंजाबची सुरुवातही काही खास झाली नाही. प्रभसिमरन सिंग ( ६), शशांक सिंग ( ०) यांना अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व आवेश खानने माघारी पाठवले. आवेशने तिसरा धक्का देताना रायली रुसोची ( २२) विकेट मिळवली आणि पंजाबची अवस्था ३ बाद ३६ अशी केली. युझवेंद्र चहलने RR ला महत्त्वाची विकेट मिळवून देताना जॉनी बेअरस्टोला ( १४) बाद केले. पण, कर्णधार सॅम करन व जितेश शर्मा ही जोडी राजस्थानची डोकेदुखी वाढवताना दिसली. या दोघांनी ४० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करून पंजाबच्या विजयाचा पाया मजबूत केला. चहलने ६३ धावांची ही भागीदारी तोडताना जितेशला २२ धावांवर बाद केले.  करनने ३८ चेंडूंत अर्धशतक झळकावून किल्ला लढवला. 

करन ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६३ धावांवर नाबाद राहिला. आशुतोष शर्माने नाबाद १७ धावा करून पंजाबचा विजय पक्का केला. पंजाबने १८.५ षटकांत ५ बाद १४५ धावा केल्या.

Web Title: IPL 2024 RR vs PBKS Live Marathi -Will Rajasthan Royals dream of Qualifier 1 be shattered? Losing to Punjab Kings changed the playoffs equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.