IPL 2024 SRH vs CSK Match Live Updates । हैदराबाद: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील अठराव्या सामन्यात दोन तगडे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने सन्मानजनक धावसंख्या उभारली. पाहुण्या संघाकडून शिवम दुबेने स्फोटक खेळी करत रंगत आणली. पण, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने दुबेला बाहेरचा रस्ता दाखवला. अखेर चेन्नईचा संघ निर्धारित २० षटकांत ५ बाद १६५ धावा करू शकला. (IPL 2024 News) हैदराबादला विजयासाठी १६६ धावांचे आव्हान आहे. अखेरच्या ४२ चेंडूत केवळ ५० धावा देत हैदराबादने ३ बळी घेतले अन् चेन्नईला १७० च्या आत रोखले.
यजमान हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स, शाहबाज अहमद, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. गोलंदाजांनी केलेल्या सांघिक खेळीच्या जोरावर यजमानांनी सामन्यात पुनरागमन केले. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ४५ धावा कुटल्या, तर रचिन रवींद्र (१२), ऋतुराज गायकवाड (२६), अजिंक्य रहाणे (३५) आणि डेरिल मिचेल (१३) धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा (३१) आणि महेंद्रसिंग धोनी (१) धावा करून नाबाद परतला.
SRH चा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, टी नटराजन.
CSK चा संघ -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डेरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा.
Web Title: IPL 2024 SRH vs CSK Match Live Updates Chennai Super Kings set Sunrisers Hyderabad a target of 166 runs to win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.