IPL 2024, SRH vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या सामन्यात CSK ने बाजी मारली. या सामन्यादरम्यान CSK चा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याने पुन्हा एकदा आपले नेतृत्व कौशल्य व समयसूचकता दाखवून सर्वांनाच धक्का दिला. धोनी मैदानावरील रणनीती आणि नियोजनासाठी ओळखला जातो. यामुळेच धोनी सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. SRH विरुद्धच्या मागील सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. पण, त्याचा वचपा काढण्यासाठी धोनीने यासाठी आधीच नियोजन केले होते. धोनीने धोकादायक ट्रॅव्हिस हेडला बाद करण्यासाठी सापळा रचला आणि तो पाहून हैदराबादची मालकीण काव्या मारनही हैराण झाली.
SRH चा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने ८ सामन्यांत २११.२५ च्या स्ट्राईक रेटने ३३८ धावा चोपल्या आहेत आणि त्याची आक्रमक सुरुवात प्रतिस्पर्धींना धडकी भरवणारी आहे. या फलंदाजाना रोखण्यासाठी धोनीने वेगळीच योजना आखली होती. तुषार देशपांडेच्या चेंडूवर हेडने शॉट खेळला जो थेट डीप मिड-विकेटवर उभ्या असलेल्या डॅरिल मिचेलच्या हातात गेला विसावला.
CSK ने प्रथम फलंदाजी करताना २ गडी गमावून २१२ धावा केल्या. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अप्रतिम खेळी करत ५४ चेंडूत ९८ धावा केल्या. डॅरिल मिचेलसह त्याने शतकी भागीदारी केली. मिचेलने ५२ धावा केल्या. शिवम दुबेने २० चेंडूत ३९धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हेडने ६ चेंडूत १३ धावा केल्या. धोनीने या फलंदाजाला बाद करण्यासाठी मोठी योजना आखली. धोनीने किवी अष्टपैलू मिचेलला योग्य जागी उभे केले आणि तुषारता चेंडू कसा टाकायचा हे सांगितले. धोनीची ही रणनीती यशस्वी ठरली आणि हेडची विकेट मिळाली. धोनीचे हे नियोजन पाहून काव्या मारनही स्तब्ध झाली.