गोलंदाजाने Run Out साठी थ्रो केला, जडेजाच्या पाठीवर आदळला; Pat Cummins ने जे केलं ते... 

१९व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने सरळ फटका मारला. जो भुवीच्या हातातच गेला आणि जडेजा धाव घेण्यासाठी पुढे आला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 02:37 PM2024-04-06T14:37:27+5:302024-04-06T14:40:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, SRH vs CSK : Pat Cummins Withdraws Run Out Appeal vs Ravindra Jadeja For Field Obstruction, Video  | गोलंदाजाने Run Out साठी थ्रो केला, जडेजाच्या पाठीवर आदळला; Pat Cummins ने जे केलं ते... 

गोलंदाजाने Run Out साठी थ्रो केला, जडेजाच्या पाठीवर आदळला; Pat Cummins ने जे केलं ते... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, SRH vs CSK : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या SRH ने आखरेले सर्व डावपेच यशस्वी ठरले आणि त्यात CSK चे फलंदाज फसले. चांगल्या सुरुवातीनंतरही चेन्नईला २० षटकांत ५ बाद १६५ धावा करता आल्या. हैदराबादने १८.१ षटकांत ४ बाद १६६ धावा करून सहज विजय मिळवला. पण, या सामन्यात असा एक प्रसंग घडला ज्याची चर्चा रंगली आहे. १९व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने सरळ फटका मारला. जो भुवीच्या हातातच गेला आणि जडेजा धाव घेण्यासाठी पुढे आला होता. तो माघारी फिरणार तोच भुवीने चेंडू यष्टींच्या दिशेने फेकला जो जडेजाच्या पाठीवर आदळला अन् मग...


प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या रचीन रविंद्रला ( १२) भुवीने माघारी पाठवले. कर्णधार ऋतुराज गायकवाड ( २६) व अजिंक्य रहाणे ( ३५) यांनी संघाचा डाव सावरला होता. शिवम दुबेने २४ चेंडूंत ४५ धावा चोपून धावगती वाढवली. रवींद्रनेही २३ चेंडूत ३१ धावा केल्या. पण, चेन्नईला १६५ धावांपर्यंतच पोहोचला आले. हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. प्रत्युत्तरात ट्रॅव्हिस हेड ( ३१) व अभिषेक शर्मा ( ३७) यांनी हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली. एडन मार्करमने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मोईन अलीने दोन विकेट्स घेऊन चेन्नईच्या आशा जागवल्या होत्या. पण, हैदराबादने ६ विकेट्सने हा सामना जिंकला.


भुवीने टाकलेल्या १९ व्या षटकात जडेजा धाव घेण्यासाठी पुढे आला होता आणि हैदराबादच्या गोलंदाजाने रनआऊट साठी चेंडू यष्टींच्या दिशेने फेकला. चेंडू जडेजाला लागला. यष्टिरक्षक क्लासेनने ऑबस्ट्रक्टिंग दी फिल्ड ( अडथळा आणणे) च्या नियमानुसार अपील केले आणि मैदानावरील अम्पायरने तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागितली. पण, कर्णधार पॅट कमिन्सने अपील रद्द केली आणि जडेजा नाबाद राहिला.  


 

Web Title: IPL 2024, SRH vs CSK : Pat Cummins Withdraws Run Out Appeal vs Ravindra Jadeja For Field Obstruction, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.