सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज

सनरायझर्स हैदराबादचे क्षेत्ररक्षण आज अव्वल दर्जाचे राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 09:03 PM2024-05-08T21:03:45+5:302024-05-08T21:14:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : Nicholas Pooran (48*) & Ayush Badoni ( 55*) match turning partnership, Bhuvneshwar kumar brillient spell, LSG set 166 runs target to SRH | सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज

सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : सनरायझर्स हैदराबादचे क्षेत्ररक्षण आज अव्वल दर्जाचे राहिले. नितिश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी दोन अविश्वसनीय झेल घेऊन पॉवर प्लेमध्ये लखनौ सुपर जायंट्सची हवा काढली. कर्णधार लोकेश राहुल व कृणाल पांड्या यांनी संघर्ष करून डाव सारवला, परंतु हैदराबादच्या गोलंदाजांनी धावांवर अंकुश ठेवला होता. क्षेत्ररक्षणात हैदराबादला पैकीच्या पैकी मार्क मिळायला हवेत. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी LSG ची लाज वाचेल एवढी धावसंख्या उभी केली. बर्थ डे बॉय पॅट कमिन्सने एक भन्नाट रन आऊट केला. 

लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 


LSGचा कर्णधार लोकेश राहुल याने टॉस जिंकून प्रथम फलंजदाजीचा निर्णय घेतला. SRH चा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने दोन विकेट्स घेऊन लखनौला मोठे धक्के दिले. नितीश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल घेतले. क्विंटन डी कॉक ( ५) व मार्कस स्टॉयनिस ( ३) पॉवर प्लेमध्ये माघारी परतले. लखनौला पहिल्या सहा षटकांत २ बाद २७ धावा करता आल्या आणि यंदाच्या पर्वातील ही पॉवर प्लेमधील तिसरी खराब कामगिरी ठरली. पण, लखौनचा हा आयपीएल इतिहासातील खराब पॉवर प्ले राहिला. भुवीने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ३-०-७-२ अशी दमदार कामगिरी केली. लोकेश मैदानावर उभा होता, परंतु हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगलेच दडपण त्याच्यावर बनवले होते. कृणाल पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने जयदेव उनाडकटला मारलेल्या दोन सिक्सने दडपण कमी केले. हा षटकार आयपीएलच्या या पर्वातील १००० वा षटकार ठरला.


आयपीएलच्या सलग तिसऱ्या पर्वात १००० षटकार खेचले गेले आहेत आणि २०२३ चा सर्वाधिक षटकाराचा विक्रम मोडण्यासाठी आता फक्त १२५ ( १७ सामने) षटकार हवे आहेत.  पॅट कमिन्सने १०व्या षटकात लोकेशला ( २९) माघारी पाठवून LSG ला तिसरा मोठा धक्का दिला. हैदराबादचे क्षेत्ररक्षण आज अविश्वसनीय राहिले आणि १२व्या षटकात कमिन्सच्या भन्नाट थ्रोवर कृणाल ( २४) रन आऊट झाला. संथ खेळपट्टीवर हैदराबादच्या गोलंदाजांनी सफाईदार कामगिरी केली. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करून लखनौला दिसाला दिला. संथ खेळपट्टीवर बदोनी थोडा वेळ घेऊन सुरेख फटके खेचताना दिसला. भुवीने ४ षटकांत १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. 

बदोनीन व पूरन यांनी शेवटच्या षटकांत टी नटराजनला टार्गेट केले आणि हैदराबादच्या ४ षटकांत त्यांनी ५० धावा चोपल्या. बदोनीने २८ चेंडूंत आयपीएलमधील चौथे अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या पर्वातील ही त्याची दुसरी फिफ्टी ठरली. पूरन व बदोनी यांनी ५२ चेंडूंत ९९ धावांची भागीदारी केली. बदोनी ३० चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला, तर पूरनने २६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या. लखनौने ४ बाद १६५ धावा केल्या. 

Web Title: IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : Nicholas Pooran (48*) & Ayush Badoni ( 55*) match turning partnership, Bhuvneshwar kumar brillient spell, LSG set 166 runs target to SRH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.