IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : सनरायझर्स हैदराबादचे क्षेत्ररक्षण आज अव्वल दर्जाचे राहिले. नितिश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी दोन अविश्वसनीय झेल घेऊन पॉवर प्लेमध्ये लखनौ सुपर जायंट्सची हवा काढली. कर्णधार लोकेश राहुल व कृणाल पांड्या यांनी संघर्ष करून डाव सारवला, परंतु हैदराबादच्या गोलंदाजांनी धावांवर अंकुश ठेवला होता. क्षेत्ररक्षणात हैदराबादला पैकीच्या पैकी मार्क मिळायला हवेत. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी LSG ची लाज वाचेल एवढी धावसंख्या उभी केली. बर्थ डे बॉय पॅट कमिन्सने एक भन्नाट रन आऊट केला.
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले
LSGचा कर्णधार लोकेश राहुल याने टॉस जिंकून प्रथम फलंजदाजीचा निर्णय घेतला. SRH चा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने दोन विकेट्स घेऊन लखनौला मोठे धक्के दिले. नितीश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल घेतले. क्विंटन डी कॉक ( ५) व मार्कस स्टॉयनिस ( ३) पॉवर प्लेमध्ये माघारी परतले. लखनौला पहिल्या सहा षटकांत २ बाद २७ धावा करता आल्या आणि यंदाच्या पर्वातील ही पॉवर प्लेमधील तिसरी खराब कामगिरी ठरली. पण, लखौनचा हा आयपीएल इतिहासातील खराब पॉवर प्ले राहिला. भुवीने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ३-०-७-२ अशी दमदार कामगिरी केली. लोकेश मैदानावर उभा होता, परंतु हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगलेच दडपण त्याच्यावर बनवले होते. कृणाल पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने जयदेव उनाडकटला मारलेल्या दोन सिक्सने दडपण कमी केले. हा षटकार आयपीएलच्या या पर्वातील १००० वा षटकार ठरला.
बदोनीन व पूरन यांनी शेवटच्या षटकांत टी नटराजनला टार्गेट केले आणि हैदराबादच्या ४ षटकांत त्यांनी ५० धावा चोपल्या. बदोनीने २८ चेंडूंत आयपीएलमधील चौथे अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या पर्वातील ही त्याची दुसरी फिफ्टी ठरली. पूरन व बदोनी यांनी ५२ चेंडूंत ९९ धावांची भागीदारी केली. बदोनी ३० चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला, तर पूरनने २६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या. लखनौने ४ बाद १६५ धावा केल्या.