Join us  

IPL 2024 SRH vs RCB: अब की बार ३०० पार नाही! RCB ने टॉस जिंकताच मीम्सचा पाऊस!

IPL 2024 SRH vs RCB Match Live: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 7:51 PM

Open in App

IPL 2024 SRH vs RCB Live Updates In Marathi | हैदराबादसनरायझर्स हैदराबाद, जो संघ विक्रमांमागून विक्रम रचतोय, त्यांच्यासमोर सतत अडखळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आहे. घरच्या मैदानावर SRH आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम पुन्हा एकदा मोडतील, असा दावा केला जात होता. RCB च्या गोलंदाजीची हालत पाहता अब की बार ३०० पार... हे नारे SRH साठी दिले गेले, परंतु RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् या चर्चेला पूर्णविराम बसला.

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. चाहते भन्नाट मीम्स व्हायरल करून आजच्या सामन्याचा आनंद घेत आहेत. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ४१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आहेत. एक संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी तर एक संघ अगदी तळाशी आहे. आरसीबीचा संघ आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे, तर हैदराबादचा संघ दुसरे स्थान पटकावण्यासाठी मैदानात आहेत. मागील वेळी हे दोन संघ जेव्हा भिडले होते तेव्हा SRH ने ऐतिहासिक कामगिरी करत २८७ धावांचा डोंगर उभारला होता

सनरायझर्स हैदराबादने सातपैकी पाच सामने जिंकून १० गुण मिळवले आहेत. तर आरसीबीला केवळ एक विजय मिळवता आला आहे. आरसीबीने आठपैकी सात सामने गमावले असून त्यांच्या खात्यात केवळ दोन गुण आहेत. 

RCB चा संघ -फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमरून ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल. 

SRH चा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्करम,  हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), निकीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडेय, टी नटराजन. 

टॅग्स :आयपीएल २०२४ऑफ द फिल्डसनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमिम्स