IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Marathi - गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर सहज विजय मिळवला. ३४ वर्षीय गोलंदाज मोहित शर्माच्या उल्लेखनीय माऱ्यानंतर साई सुदर्शनने फलंदाजीत दमदार खेळ केला. शुबमन गिल, डेव्हिड मिलर व वृद्धीमान सहा यांनीही चांगली फलंदाजी केली.
मुंबई इंडियन्सचे निष्ठावंत चाहते...! हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर हे काय बोलून गेला MIचा स्टार?
गुजरातच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना हैदराबादच्या धावगतीला वेसण घातले. मोहित शर्माने २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याने २० व्या षटकात फक्त ३ धावा दिल्या आणि ३ विकेट्स मिळवून दिल्या. अभिषेक शर्मा ( २९) व अब्दुल समद ( २९) यांनी हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. हेनरिच क्लासेन ( २४) व शाहबाज अहमज ( २२) यांनी चांगली फलंदाजी केली. पण, मागील सामन्यात रेकॉर्ड ब्रेकिंग २७५ धावा कुटणाऱ्या हैदराबादच्या फलंदाजांना शांत ठेवण्यात गुजरातच्या गोलंदाजांना यश आले. राशिद, नूर, उमेश यादव, अजमतुल्लाह ओमारजाई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. हैदराबादला २० षटकांत ८ बाद १६२ धावाच उभ्या करता आल्या.
वृद्धीमान सहा व शुबमन गिल यांनी गुजरातला आक्रमक सुरुवात करून दिली. पाचव्या षटकात शाहबाज अहमदच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सहा ( २५) झेलबाद होऊन माघारी परतला. पण, गुजरताने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५२ धावा फलकावर चढवल्या. सहा व गिल यांनी आयपीएलमध्ये ओपनर म्हणून १००० धावांचा टप्पा ओलांडला आणि असा पराक्रम करणारी ही १४वी ओपनिंग जोडी ठरली. शुबमन चांगल्या टचमध्ये दिसला आणि त्याने २८ चेंडूंत २ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. मयांक मार्कंडेच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. गुजरातने पहिल्या १० षटकांत २ बाद ७२ धावा केल्या होत्या.
साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर यांनी गुजरातचा डाव सावरला. खेळपट्टीवर सेट झाल्यावर दोघांनी गिअर बदलला आणि हैदराबादच्या गोलंदाजांवर प्रहार सुरू केला. ६६ धावांची ही भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. सुदर्शन ३६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांसह ४५ धावांवर झेलबाद झाला. गुजरातला २२ चेंडूंत २५ धावा करायच्या होत्या. मिलर व विजय शंकर यांनी सामना संपवला आणि गुजरातला ७ विकेट्सने विजय मिळवून दिला. मिलरने २७ चेंडूंत नाबाद ४४ धावांची आक्रमक खेळी केली. गुजरातने १९.१ षटकांत ३ बाद १६८ धावा केल्या.
Web Title: IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates - Gujarat Titans won by 7 wickets against Sunrisers Hyderabad, Mohit Sharma, Sai Sudharsan & David miller shine
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.