IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Marathi - सनरायझर्स हैदराबादचा संघ पॉवर प्लेमध्ये आक्रमक खेळी करण्यासाठी ओळखला जातो. पण, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी त्यांना ६ षटकांत २ बाद ३७ धावांवर अडकवले. वादळी खेळी करणारा ट्रॅव्हिस हेड शांत होता, परंतु नितीश कुमार रेड्डीने ( Nitish Kumar Reddy) अनपेक्षित खेळी केली. ज्या विषयाचा अभ्यासच केला नव्हता तोच पेपर आला, अशी अवस्था RR च्या गोलंदाजांची झाली. हेनरिच क्लासेननेही अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली. आयपीएल २०२४ मधील सर्वोत्तम गोलंदाजी असलेल्या राजस्थानला SRH च्या या फलंदाजांनी झोडले. युझवेंद्र चहलच्या ४ षटकांत सर्वाधिक ६२ धावा कुटल्या गेल्या.
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर...
SRH ला प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊनही अपेक्षित सुरुवात करता आली नाही. RR चा ट्रेंट बोल्ट व आऱ अश्विन यांनी पॉवर प्लेमध्ये चांगला मारा केला. त्यात आवेश खान व संदीप शर्मा यांनी त्यांच्या पहिल्या षटकात विकेट घेतल्या. अभिषेक शर्मा ( १२) झेलबाद झाला व अनमोलप्रीत सिंग ( ५) अपयशी ठरला. SRH ला पॉवर प्लेमध्ये २ बाद ३७ धावाच करता आल्या. ट्रॅव्हिस हेडची बॅट संथ ठेवण्यात RR च्या गोलंदाजांना यश आले होते, परंतु नितीश कुमार रेड्डीने सामन्याचे चित्रच बदलले. त्याने ३० चेंडूंत फिफ्टी झळकावली. हेडही नंतर फटकेबाजी करताना दिसला आणि त्याने ४४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. आवेशच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होण्याच्या आधी, संजू सॅमसनने हेडला रन आऊट केले होते, परंतु तिसऱ्या अम्पायरने त्याला नाबाद दिले.