IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Marathi - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफमध्ये जागा निश्चित करण्याची संधी आज राजस्थान रॉयल्सला आहे... RR १६ गुणांसह सध्या तालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आहे. SRH ९ सामन्यांत १० गुण मिळवून पाचव्या क्रमांकावर आहेत. SRH ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागील दोन सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करताना SRH ला अपयश आले होते आणि आजचा निर्णय चाहत्यांसाठी आनंददायी ठरला. पण, त्यांना अपेक्षित सुरुवात करता आली नाही. त्यात अम्पायरच्या एका निर्णयाने पुन्हा वादाला जागा मिळाली.
SRH vs RR यांच्यात आतापर्यंत १८ सामने झाले आणि दोन्ही संघ ९-९ असे बरोबरीत आहेत. युझवेंद्र चहलला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी एक बळी घेणे आवश्यक आहे. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडचा पॉईंटला रियान परागसाठी कॅचची संधी होती, पण चेंडू वेगाने त्याच्या हाताच्या मधून चौकार गेला. आर अश्विनने टाकलेल्या चौथ्या षटकार हेड पायचीत झाला होता, परंतु अम्पायर्स कॉलमुळे तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद दिली. बोल्ट व अश्विन यांनी पहिल्या चार षटकांत SRH वर दडपण निर्माण केले होते आणि त्याचे फळ पाचव्या षटकात मिळाले. आवेश खानच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा ( १२) झेलबाद झाला.
संदीप शर्माने त्याच्या पहिल्याच चेंडूवर अनमोलप्रीत सिंगला ( ५) माघारी पाठवले. SRH ने यंदाच्या आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी ( २-३७) धावा आज केल्या. SRH आक्रमक फळीला RRच्या गोलंदाजांनी शांत ठेवले होते. हेडने ९व्या षटकात गिअर बदलला अन् युझवेंद्र चहलला ६,६,४ असे फटके खेचले. हेडची खेळी संथ असली तरी तो मैदानावर उभा राहिल्याने नितिश कुमार रेड्डीला आक्रमक फटकेबाजी करण्याची मुभा मिळाली. त्याने ३० चेंडूंत फिफ्टी पूर्ण केली.
आवेश खानच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिड हेड फटका मारण्यासाठी पुढे गेला, परंतु चेंडू यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हाती विसावला. संजूने चतुराईने रन आऊट केले. पण, तिसऱ्या अम्पायरने हेडला नाबाद दिले. रिप्लेमध्ये चेंडू जेव्हा स्टम्पवर आदळला तेव्हा हेडची बॅट किंचीत हवेत होती. तरीही त्याला नाबाद दिल्याने RR कोच कुमार संगकारा संतापला. पण, पुढच्याच चेंडूवर आवेशने त्याचा त्रिफळा उडवला. हेड ४४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा केल्या.
Web Title: IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Marathi - Travis Head was given not-out, Sangakkara was unhappy, asking questions to the umpire near dug-out and next ball Head got out.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.