रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा 

विराट कोहली मैदानावर उभा होता, परंतु त्याचा स्ट्राईक रेट हा संघासाठी पुन्हा मारक ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 09:01 PM2024-04-25T21:01:16+5:302024-04-25T21:09:49+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Rajat Patidar ( 50), Virat Kohli ( 51) score fifty, Cameron Green ( 37* ), but Jaydev Unadkat take 3 crusial wickets, RCB set 207 runs target fo SRH  | रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा 

रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi :  रजत पाटीदारने १९ चेंडूंत अर्धशतक झळकावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सावरले. विराट कोहली मैदानावर उभा होता, परंतु त्याचा स्ट्राईक रेट हा संघासाठी पुन्हा मारक ठरला. त्याने ४३ चेंडूंत ५१ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादच्या जयदेन उनाडकटने संथ गतीने अचूक मारा करून ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि RCB च्या आधीच आटलेल्या धावा आणखी आटवल्या होत्या. कॅमेरून ग्रीन व दिनेश कार्तिक यांनी शेवटच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून संघाला दोनशेपार पोहोचवले. 

६,६,६,६‍! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम

विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस ( २५) यांनी RCB ला ४८ धावांची सलामी दिली. विराटने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून ४००० हून अधिक धावा आज पूर्ण केल्या. मयांक मार्कंडेने संथगतीने चेंडू टाकून विल जॅक्सला ( ६) त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेल्या रजत पाटीदारने तिसऱ्या विकेटसाठी विराटसोबत ३४ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. रजतने ११व्या षटकात मयांकला सलग ४ षटकार खेचले. पण, त्यानंतर ९ चेंडूंत एकेरी धाव आल्याने रजतवर दडपण वाढले आणि उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने २० चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावा केल्या. विराटला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ३७ चेंडू खेळावी लागली.

    
विराट मैदानावर उभा होता, परंतु तो चाचपडताना दिसला. जयदेवच्या स्लोव्हर चेंडूंनी त्याला हैराण केले होते आणि हे हेरून हैदराबादाच्या गोलंदाजाने विराटला माघारी पाठवले. जयदनेवने हैदराबादला दुसरी मोठी विकेट मिळवून दिली. विराट ४३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ११८.६च्या स्ट्राईक रेटने ५१ धावा करून माघारी परतला. SRH ची मालकिण काव्या मारन आनंदी झाली. कॅमेरून ग्रीन व महिपाल लोम्रोर यांच्यावर वेगाने धावा करण्याची जबाबदारी होती, परंतु हैदराबादकडून चतुर गोलंदाजी पाहायला मिळाली. जयदेवने तिसरी विकेट घेताना महिपालला ( ७) संथ चेंडूवर झेलबाद केले. 


जयदेवने त्याच्या १००व्या आयपीएल सामन्यात ४ षटकांत ३० धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. २०२१ नंतर त्याने प्रथमच एका डावात ३ विकेट्स घेतल्या. ग्रीनने १९व्या षटकात पॅट कमिन्सची धुलाई केली. पण, कमिन्सने पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिकला ( ११) बाद केले. ग्रीनने २० चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, तर इम्पॅक्ट प्लेअर स्वप्निल सिंगने ( १२) धावा करून संघाला ७ बाद  २०६  धावांपर्यंत पोहोचवले.

Web Title: IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Rajat Patidar ( 50), Virat Kohli ( 51) score fifty, Cameron Green ( 37* ), but Jaydev Unadkat take 3 crusial wickets, RCB set 207 runs target fo SRH 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.