आज वानखेडेवर बरंच काही घडलं! तिलकला चेंडू लागला, सूर्यकुमार रोहितला भेटला पण, हार्दिक...

Mumbai Indians चे नेतृत्व स्वीकारल्यापासून हार्दिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागतोय.. घरच्या मैदानावरही चाहत्यांनी त्याला ट्रोल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 07:32 PM2024-04-06T19:32:30+5:302024-04-06T19:32:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Suryakumar Yadav meet Rohit Sharma, Hardik Pandya...; Here are a few observations from the net session of Mumbai Indians and Delhi Capitals | आज वानखेडेवर बरंच काही घडलं! तिलकला चेंडू लागला, सूर्यकुमार रोहितला भेटला पण, हार्दिक...

आज वानखेडेवर बरंच काही घडलं! तिलकला चेंडू लागला, सूर्यकुमार रोहितला भेटला पण, हार्दिक...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 MI vs DC : मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात रविवारी घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा सामना करणार आहे. ६ दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू सलग ३ पराभव विसरून पुन्हा नव्या दमाने सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहेत. आज खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर कसून सराव केला. रोहित शर्मा दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याच्यासोबत मस्करी करताना दिसला. कुलदीप यादवची दुखापत अद्याप बरी न झाल्याने, उद्या त्याचे खेळणे अनिश्चितच आहे. त्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) चेहऱ्यावर  आत्मविश्वास झळकत होता.


Mumbai Indians चे नेतृत्व स्वीकारल्यापासून हार्दिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागतोय.. घरच्या मैदानावरही चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. आत अपेक्षा आहे की उद्याच्या लढतीत असे चित्र दिसणार नाही. Delhi Capitals चा मेंटॉर सौरव गांगुलीनेही चाहत्यांच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. हार्दिकला कॅप्टन बनवण्याचा निर्णय फ्रँचायझीचा होता, यात त्याची चूक काय, असा सवाल दादाने केला. सूर्यकुमार यादव दुखापतीतून पुनरागमन करणार आहे आणि आयपीएल २०२४ मध्ये तो त्याचा पहिला सामना उद्याच खेळेल. त्यामुळे MI चाहत्यांना विजयाची आशा आहे.

आज वानखेडेवर काय काय घडले...?
- मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी आज फिटनेस टेस्ट दिली, पंरतु दोघांनी गोलंदाजी केली नाही
- मिचेल मार्श आज नेट बाहेर उभा राहून सहकाऱ्यांचा सराव पाहत होता, त्याने स्वतः सराव केला नाही.
- तिलक वर्माला नेटमध्ये सराव करताना चेंडू लागला, परंतु ही दुखापत गंभीर नाही. तो उद्या खेळेल 
- सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी ऑप्शनल सराव सत्रात विश्रांती घेणं पसंत केलं 
- रोहित शर्मा आज निवांत होता आणि तो संघ मालक आकाश अंबानी यांच्यासोबत चर्चा करताना दिसला
- हार्दिक पांड्याने थ्रो डाऊन स्पेशालिस्ट चायनामन गोलंदाज राघव गोयल यांचा सामना केला आणि त्याने काही हॅलिकॉप्टर शॉट्सही लगावले. 
 

Web Title: IPL 2024 : Suryakumar Yadav meet Rohit Sharma, Hardik Pandya...; Here are a few observations from the net session of Mumbai Indians and Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.