मोठी बातमी! IPL 2024 ची ट्रेड विंडो पुन्हा खुली होतेय; रोहित सोडू शकतो मुंबई इंडियन्सची साथ?

रोहितचा अपमान केल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसली आहे आणि त्याने आता अन्य फ्रँचायझीकडून खेळावे अशीही अनेकांची इच्छा आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 08:35 PM2023-12-17T20:35:24+5:302023-12-17T20:36:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Trade Window To Reopen Again On December 20; Can Rohit Sharma Still Move From Mumbai Indians To Different Team?  | मोठी बातमी! IPL 2024 ची ट्रेड विंडो पुन्हा खुली होतेय; रोहित सोडू शकतो मुंबई इंडियन्सची साथ?

मोठी बातमी! IPL 2024 ची ट्रेड विंडो पुन्हा खुली होतेय; रोहित सोडू शकतो मुंबई इंडियन्सची साथ?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Trade Window Reopen : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सध्या एकच गोष्ट चर्चेत आहे आणि ती म्हणजे मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians Captain) कर्णधारपदी हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) केलेली निवड... रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली MI ने पाच जेतेपदं पटकावली आणि आता तोच रोहित आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहितच्या व मुंबई इंडियन्सच्याही फॅन्सना फ्रँचायझीचा हा निर्णय काही पटलेला नाही. रोहितचा अपमान केल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसली आहे आणि त्याने आता अन्य फ्रँचायझीकडून खेळावे अशीही अनेकांची इच्छा आहे. 


आयपीएल २०२४च्या लिलावापूर्वी बंद करण्यात आलेली ट्रेडिंग विंडो २० डिसेंबरनंतर पुन्हा खुली होणार आहे. त्यामुळे लिलावानंतर ते आयपीएल २०२४ ला सुरू होण्यास १ महिना शिल्लक असेपर्यंत आणखी मोठी घडामोड झालेली पाहायला मिळू शकते. याच ट्रेड विंडोतून हार्दिक गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्याच्यासाठी MI ने सर्वात महागडा खेळाडू कॅमेरून ग्रीन ( १७ कोटी) याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे सोपवले. त्यामुळे आता हार्दिक कॅप्टन झाल्याने रोहितला फॅन्सकडून चेन्नई सुपर किंग्सची ऑफरही दिली जात आहे.  

लिलावात ३३३ खेळाडू... 
IPL 2024 च्या मिनी लिलावासाठी ३३३ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. ज्यामध्ये संघांकडे फक्त ७७ स्लॉट शिल्लक आहेत. म्हणजेच भारतीय आणि परदेशी खेळाडूंसह एकूण ७७ खेळाडू सर्व १० फ्रँचायझीमध्ये  सामील होऊ शकतील. लिलावानंतर ट्रेड विंडोद्वारे खेळाडूंच्या नशिबाचा कलही बदलू शकतो. वृत्तानुसार, ही ट्रेड विंडो २० डिसेंबरपासून उघडेल आणि फेब्रुवारी २०२४ पर्यंत खुली राहील.

ट्रेड विंडोचे नियम काय आहेत?
ट्रेडद्वारे, एक खेळाडू केवळ ट्रेड विंडो उघडी असतानाच एका फ्रँचायझीमधून दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये जाऊ शकतो. हा सर्व-कॅश डील किंवा प्लेअर फॉर प्लेयर डील असू शकतो. नियमानुसार, आयपीएल स्पर्धा ट्रेड विंडो संपल्यानंतर एक महिन्यानंतर सुरू होते.

प्रत्येक फ्रँचायझीसाठी किती स्लॉट उपलब्ध आहेत 

  • गुजरात टायटन्स: रिक्त स्लॉट- ८, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- २  
  • सनरायझर्स  हैदराबाद: रिक्त स्लॉट- ६, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- ३
  • कोलकाता नाइट रायडर्स :- रिक्त स्लॉट- १२, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- ४
  • चेन्नई सुपर किंग्स :- रिक्त स्लॉट- ६ , परदेशी खेळाडूंचा स्लॉट- ३
  • पंजाब किंग्स :- रिक्त स्लॉट- ८, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- २
  • दिल्ली कॅपिटल्स: रिक्त स्लॉट- ९, परदेशी खेळाडूंचा स्लॉट: ४
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रिक्त स्लॉट- ६, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- ३ 
  • मुंबई इंडियन्स: रिक्त स्लॉट- ८, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- ४
  • राजस्थान रॉयल्स: रिक्त स्लॉट- ८, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- ३
  • लखनौ सुपर जायंट्स: रिक्त स्लॉट- ६, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- २

 

रोहित शर्मा आयपीएल २०२४ मध्ये दुसऱ्या संघाकडून खेळणार का?
 
२० डिसेंबरनंतर पुन्हा ट्रेड विंडो खुली होणार आहे आणि त्यामुळे रोहितला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी अन्य फ्रँचायझींसाठी संधी आहे. आयपीएल २०२४ ला सुरुवात होण्यापूर्वी रोहितसाठी ट्रेडिंग झाली तर तो अन्य फ्रँचायझीकडून खेळू शकतो, परंतु मुंबई इंडियन्स त्याला सोडणार नाहीत. कारण हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असेल. रोहितने मुंबई फ्रँचायझीला ५ जेतेपदं जिंकून दिली आहेत. मुंबई इंडियन्स रोहितला १६ कोटी पगार देतो आणि तेवढी रक्कम ऑक्शननंतर संघांकडे शिल्लक राहणे अवघड आहे. त्यामुळे रोहितचे दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळणे अवघड आहे.  

Web Title: IPL 2024 Trade Window To Reopen Again On December 20; Can Rohit Sharma Still Move From Mumbai Indians To Different Team? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.