पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!

गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:13 PM2024-05-14T13:13:12+5:302024-05-14T13:16:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 updates Gujarat Titans to refund all GT vs KKR ticket holders, read here details  | पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!

पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Gujarat Titans fully refunded GT vs KKR Ticket : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ६३ वा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार होता. यजमान गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना रद्द झाल्याने यजमानांचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या बॅटिंगने गुजरातला स्पर्धेबाहेर केले. यंदाच्या हंगामातून बाहेर होणारा गुजरात हा तिसरा संघ ठरला आहे. खरे तर पावसाने गुजरातला बुडवले असले तरी त्यांच्या फ्रँचायझीच्या एका निर्णयाने चाहते चांगलेच सुखावले आहेत. (IPL 2024 News) 

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून बाहेर झाल्यानंतर गुजरातच्या फ्रँचायझीने एक मोठा निर्णय घेतला. फ्रँचायझीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल अरविंद सिंह यांनी सांगितले की, खराब वातावरणामुळे सामना होऊ शकला नाही यामुळे नाराज आहे. पण, टायटन्स फॅमिलीला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचा सन्मान म्हणून आम्ही त्यांच्या तिकिटाचे सर्व पैसे परत करणार आहोत. 

दरम्यान, चाहत्यांना तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी त्यांचे तिकीट जपून ठेवावे लागेल. तरच तिकीटधारकांना तिकिटाची संपूर्ण रक्कम परत केली जाईल. पेटीएम इनसाइडरद्वारे १४ मे रोजी ईमेल आणि व्हॉट्सॲपद्वारे माहिती दिली जाणार आहे. पावसामुळे सामना होऊ शकला नाही, पण मैदानावर यजमान संघाने केलेली काही खास व्यवस्था चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी पुरेशी होती. सामना रद्द झाल्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि संपूर्ण संघाने स्टेडियममध्ये फेरफटका मारला आणि चाहत्यांचे आभार मानले. आपल्या चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल गुजरातच्या शिलेदारांनी त्यांच्या प्रेमाला दाद दिली. 

Web Title: IPL 2024 updates Gujarat Titans to refund all GT vs KKR ticket holders, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.