Hardik Pandya on KKR vs MI match : कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या तोंडचा घास पळवून प्ले ऑफचे तिकीट मिळवले. सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी गोलंदाजांच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने विजय साकारला. पावसाने केलेल्या बॅटिंगमुळे सामन्यात व्यत्यय आला. पण, अखेर केकेआरने विजय मिळवत मुंबईला पराभवाची धूळ चारली. केकेआरविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. या मोसमात आम्ही चांगले क्रिकेट खेळलो नाही, अशी कबुली हार्दिकने दिली आहे. (IPL 2024 News)
पराभवानंतर हार्दिकने सांगितले की, फलंदाजीची बाजू म्हणून आम्ही पाया मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर आम्ही त्याचा फायदा उठवू शकलो नाही आणि गती राखू शकलो नाही. पावसामुळे गोलंदाजांची गती निर्णायक ठरत होती. पण मला वाटले की गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सीमारेषेवरून माघारी येणारा प्रत्येक चेंडू ओला होऊन परतत होता. मग कोणताही न विचार करताना खेळाचा आनंद घेण्याचे ठरवले. अंतिम सामन्याचा आनंद घेण्याचे आमचे लक्ष्य आहे. सुरुवातीपासूनच मी या विचाराचा राहिलो आहे. मला वाटत नाही की, आम्ही यंदाच्या हंगामात चांगले क्रिकेट खेळले आहे.
मुंबईचा पराभवसामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, मुंबई इंडियन्सच्या अप्रतिम गोलंदाजीसमोर कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरच्या २१ चेंडूत ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित १६ षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. मग आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सने ६.४ षटकांत एकही गडी न गमावता ६५ धावा केल्या होत्या. पण केकेआरचा स्टार फिरकीपटू नरेनने इशान किशनची (२२ चेंडूत ४० धावा) खेळी रोखली. तर, चक्रवर्तीने १७ धावांत दोन आणि रसेलने ३२ धावांत दोन बळी घेतले. यामुळे केकेआरने तेराव्या षटकात मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परत पाठवला. त्यानंतर मुंबई १६ षटकांत ८ बाद केवळ १३९ धावा करू शकली अन् सामना १८ धावांनी गमावला.