Rohit Sharma Crying in Dressing Room : सोमवारी मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून यंदाच्या हंगामातील चौथा विजय मिळवला. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये बसलेला रोहित शर्मा खूपच निराश दिसला. या स्पर्धेत अपयशी ठरलेल्या रोहितला पॅट कमिन्सने अवघ्या पाच चेंडूत चार धावांवर बाद केले. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे.
नंतर रोहित डोळे चोळताना देखील दिसला, ज्यामुळे चाहत्यांना असे वाटले की तो कदाचित रडत असेल. व्हिडीओतून सर्वकाही स्पष्ट होत नसले तरी रोहित रडत असल्याची चर्चा रंगली आहे. रोहितने आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध शतक झळकावले होते, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता.
दरम्यान, आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ५५ व्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या स्फोटक शतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर १६ चेंडू शिल्लक असताना ७ गडी राखून शानदार विजय नोंदवला. पण, सतत फ्लॉप ठरत असलेल्या रोहित शर्माने या सामन्यातही निराशाजनक कामगिरी केली. तो पाच चेंडूंत अवघ्या ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय संघाचा कर्णधार आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत अपयशी ठरला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची अवस्थाही बिकट असून ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. या मोसमात त्याने निश्चितच शतक झळकावले आहे, पण रोहित शर्मा गेल्या ५ सामन्यांमध्ये फॉर्मसाठी झगडताना दिसला.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा ५ चेंडूत केवळ ४ धावा करून बाद झाला. स्वस्तात बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा तो निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तो ड्रेसिंग रूममध्येही उदास दिसत होता. तो ड्रेसिंग रूममध्ये रडताना आणि अश्रू पुसतानाही दिसला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.