IPL 2024: भारताचा सुपर स्टार विराट कोहली ( Virat Kohli ) वन डे वर्ल्ड कप नंतर क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याची संघात निवड झाली होती, परंतु वैयक्तिक कारणामुळे त्याने माघार घेतली. दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी त्याने ही सुट्टी घेतली होती. पण, आता तो आगामी इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये खेळणार की नाही, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. विराटचा लंडनमधील फोटो व्हायरल झाला होता आणि त्यापलिकडे त्याच्याबाबत कोणतेही अपडेट्स समोर आलेले नाहीत. आता आयपीएल २०२४ दहा दिवसांवर आली आहे आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे.
आयपीएलसाठी ३५ वर्षीय फलंदाज पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. स्पोर्ट्स तकने दिलेल्या वृत्तानुसार
विराट कोहली लवकरच RCB कॅम्पमध्ये दाखल होणार आहे. कदाचित तो १६ मार्चच्या आधीच बंगळुरू येथे दाखल होईल. २००८ पासून तो RCB कडून खेळतोय आणि आयपीएल इतिहासात एकाच फ्रँचायझीकडून १६ वर्ष खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. विराटने मागील पर्वात १४ सामन्यांत २ शतकं व सहा अर्धशतकांसह ६३९ धावा केल्या होत्या. त्यात त्याने ६५ चौकार व १६ षटकार खेचले होते. तरीही संघाला प्ले ऑफसाठी पात्र ठरता आले नाही.
T20 World Cup संघातून विराट कोहलीचा पत्ता कट?
विराट कोहलीने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये जरी खोऱ्याने धावा केल्या, तरी त्याचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणे शक्य नाही. टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार निवड समिती आणि संघ व्यवस्थापन विराटला जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संघात घेण्यात इच्छुक नाहीत. ट्वेंटी-२० सारख्या फॉरमॅटमध्ये विराट संघाची गजर पूर्ण करत नसल्याचे व्यवस्थापनाचे मत आहे. बीसीसीआयचे विराटबाबतचा निर्णय हा निवड समिती प्रमुख अजित आगरकर याच्यावर सोपवला आहे. त्यांना या निर्णयात अन्य कोणालाही सामावून घ्याचे नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटबाबत आगरकर लवकरच विराटसोबत चर्चा करणार आहे.
Web Title: IPL 2024: Virat Kohli is set to join the RCB camp in Bengaluru as early as March 16
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.