Sunrisers Hyderabad vs Punjab Kings, 27th Match : सनरायझर्स हैदराबादच्या संघानं आपल्या फलंदाजीतील ताकद दाखवून देत पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात दिमाखदार अन् विक्रमी विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यात सर्वाधिक धावा करून विजय मिळवल्यावर हैदराबादच्या संघाला सलग चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. विक्रमी विजयाची नोंद करत ऑरेंज आर्मी पुन्हा एकदा ट्रॅकवर आलीये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीनं पहिल्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी रचली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रेयस अय्यर ८२ (३६), प्रभसिमरन सिंग ४२ (२३), प्रियांश आर्य ३६ (१३) आणि स्टॉयनिसनं ११ चेंडूत केलेल्या नाबाद ३४ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या संघानें निर्धारित २० षटकात ६ बाद २४५ धावा करत हैदराबादसमोर २४६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मानं केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर हैदराबादच्या संघाने ८ विकेट आणि ९ चेंडू राखून हा विजय मिळवला. हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला आहे. गत हंगामात पंजाब किंग्ज संघानं कोलकाता संघा विरुद्ध २६२ धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला होता.
"धिस वन इज फॉर ऑरेंज आर्मी"... नो बॉलवर फ्री हिट मिळते; अभिषेक शर्माला सेंच्युरी मिळाली!
IPL मध्ये सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ
- २६२ धावा - पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता- २०२४
- २४६ धावा- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, हैदराबाद, २०२५
- २२४ धावा- राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, शारजहा, २०२०
- २२४ धावा - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, २०२४
- २१९ धावा- मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली, २०२१
SRH कडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सलामी भागीदारी रचत ट्रॅविस हेड अन् अभिषेकनं सेट केला सामना
पंजाब किंग्जच्या संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमक अंदाजात सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी करत पंजाबच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. हैदराबादच्या संघाकडून पहिल्या विकेटसाठी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मोठी भागीदारी रचली. सनरायझर्सकडून सर्वाधिक धावांची सलामी देण्याचा विक्रम हा बेयरस्ट्रो आणि डेविड वॉर्नरच्या नावे आहे. २०१९ मध्ये या जोडीनं १८५ धावांची भागीदारी रचली होती. ट्रॅविस हेड ३७ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकार मारून बाद झाला. अभिषेक शर्मानं ५५ चेंडूत १४ चौकार आणि १० षटकाराच्या मदतीने १४१ धावांची खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. हेन्री क्लासेन १४ चेंडूत नाबाद २१ आणि इशान किशन याने ६ चेंडूत नाबाद ९ धावा करत संघाच्या विजय निश्चित केला.
Web Title: IPL 2025 Abhishek Sharma Travis Head Hit Show SRH Records The 2nd Highest Successful Run Chase, Defeat PBKS By 8 Wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.