पंजाबच्या युवा जलदगती गोलंदाज अश्वनी कुमार (Ashwani Kumar) या युवा गोलंदाजाने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये स्वप्नवत पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या चेंडूवर त्याने अंजिक्य राहणेची विकेट घेतली. त्यानंतर रिंकू सिंह आणि मनिष पांडेच्या रुपात पहिल्या तीन षटकात त्याने ३ विकेट आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. मसल पॉवर रसेल गंडवलं परफेक्ट सेटपअसह त्याच्या रुपात अश्वनी कुमार याने चार विकेट्स घेत कमालीचे पदार्पण केले आहे. पहिल्या षटकात त्याच्या गोलंदाजीवर सुटलेला एक झेल आण चौथे षटक टाकण्याची संधी न मिळाल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील या नव्या भिडूला पदार्पणात 'पंजा' मारायची संधी हुकली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मसल पॉवर रसेलला परफेक्ट सेटपअसह केलं बोल्ड
कोलकाताच्या डावातील १३ व्या षटकात अश्वनी आपलं चौथं षटक घेऊन आला. या षटकातील पहिल्या चेंजूवर रसेलनं एक खणखणीत चौकार मारला. त्यानंतर आखूड टप्प्याच्या उसळी घेणाऱ्या चेंडूवर त्याने मसल पॉवर रसेलला चकवा दिला. चौथ्या चेंडूवर टप्पा बदलून कमालीच्या इनस्विंगसह त्याने रसेलचा करेक्ट कार्यक्रम केला. त्याने घेतलेली प्रत्येक विकेट एकदम भारी होती. पण रसेलच्या विकेट ही या युवा गोलंदाजातील कौशल्याचा सर्वोत्तम दर्जा दाखवणारी होती.
शेर ए पंजाब! कोण आहे Ashwani Kumar? ज्यानं पहिल्या चेंडूवर घेतली अजिंक्य रहाणेची विकेट
पदार्पणाचा सेट केला खास रेकॉर्ड
अश्वनी कुमार याने पदार्पणाच्या सामन्यात ४ षटकात २४ धावा खर्च करत ४ महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. पदार्पणाता भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोच्च कामगिरीही ठरली. याआधी २००९ मध्ये अमित सिंह याने ९ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड होता. हा विक्रम मागे टाकत पदार्पणात सर्वोच्च कामगिरीचा विक्रम आता अश्वनी याच्या नावे झालाय. आयपीएलमध्ये पदार्पणात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत अल्झारी जोसेफ आघाडीवर आहे. २०१९ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करताना त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात १२ धावा खर्च करत ६ विकेट्स घेतल्या होत्या. अँड्र टाये १७ धावा खर्च करून ५ विकेट्स आणि शोएब अख्तर ११ धावा खर्च करून ४ विकेट्सह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ आता अश्वनीचा नंबर लागतो.
मनिष पांडेची विकेट
पहिल्या षटकात ८ धावा खर्च करून पहिल्या बॉलवर विकेट घेणाऱ्या अश्वनी पुन्हा ११ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. या षटकात त्याने रिंक सिंहच्या रुपात आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. याच षटकात त्याने मनिष पांडेला बोल्ड केले.
अजिंक्य रहाणेच्या विकेट्सह झोकात पदार्पण
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानं कोलकाताच्या डावातील चौथ्या षटकात अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तिलक वर्मानं त्याचा झेल घेतला. या विकेटसह आयपीएलमध्ये पदार्पणात विकेट घेणारा तो १० गोलंदाजही ठरला.
Web Title: IPL 2025 Andre Russell Loses Middle Stump To Ashwani Kumar MI Debutant Makes Waves With Ajinkya Rahane Rinku Singh Manish Pandey Four Wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.