Join us

२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड

कोण आहे तो अनसोल्ड राहिलेला क्रिकेटर ज्यानं भारताकडून ठोकलीये सर्वात जलद सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:42 IST

Open in App

Unsold Player Urvil Patel Fastest T20 Hundred Record : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनेक भारतीय कॅप्ड अन् कॅप्ड खेळाडूंवर मोठी बोली लागली. पण यंदाच्या लिलावात अनेक खेळाडूंना अनसोल्डचा टॅगही लागला. ज्यात डेविड वॉर्नरपासून ते अगदी पृथ्वी शॉपर्यंतच्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. याच यादीत राहिलेल्या अनसोल्ड खेळाडूनं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत कमालीची फलंदाजी  करत खास विक्रम नोंदवला आहे. कोणत्या फ्रँचायझी संघानं भाव न दिलेल्या या पठ्य़ानं सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत फक्त २८ चेंडूत शतक झळकावले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो पहिला भारतीय आहे.

कोण आहे तो बॅटर, ज्यानं विक्रमी बोली लागलेल्या पंतचा विक्रमही काढला मोडीत

आयपीएल मेगा लिलावात भाव न मिळालेल्या २६ वर्षीय खेळाडूचं नाव  उर्विल पटेल असं आहे. तो एक विकेट किपर बॅटर आहे. मेगा लिलावात आपल्यावर भरवसा न दाखवून फ्रँचायझी मालकांनी मोठी चूक केलीये, हेच त्याने आपल्या खेळीतून दाखवून दिले आहे. या पठ्ठानं मेगा लिलावात विक्रमी बोली लागलेल्या रिषभ पंतचा विक्रमही मोडीत काढला आहे. 

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारा भारतीय फलंदाज

भारतीय विकेट किपर बॅटरनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गुजरात संघाकडून खेळताना त्रिपुरा विरुद्धच्या लढतीत विक्रमी खेळी केली. त्याने अवघ्या २८ चेंडूत शतक साजरे केले. कोणत्याही भारतीयाने टी-२० क्रिकेटमध्ये केलेले हे सर्वात जलद शतक आहे. एकंदरीत विचार करता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

एक नजर टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद शतकी खेळीच्या रेकॉर्ड्सवर   (Fastest T20 hundreds)

 

  • भारतीय वंशाचा एस्टोनिय क्रिकेटर साहिल चौहान याने सायप्रस विरुद्धच्या सामन्यात २७ चेंडूत झळकावले होते शतक (२०२४)
  • गुजरातकडून खेळताना उर्विल पटेलनं त्रिपूराविरुद्धच्या सामन्यात २८ चेंडूत साजरे केले शतक (२०२४)  
  • ख्रिस गेलनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून खेळताना त्याने पुणे वॉरियर्स विरुद्ध ३० चेंडूत शतक पूर्ण केले होते. (२०१३)
  • रिषभ पंतनं दिल्लीकडून खेळताना हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूत शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले होते. (२०१८)

मिनी लिलावात GT नं लावली होती बोली, मेगा लिलावात लागला अनसोल्डचा टॅग

२०२३ च्या हंगामात उर्विल पटेल हा गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. मिनी लिलावात गुजरातच्या  संघाने २० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण यंदाच्या लिलावात ३० लाख या मूळ किंमतीसह त्याने नाव नोंदवले होते. पण त्याला कोणत्याही फ्रँचायझी संघाने विकत घेतले नाही.

टॅग्स :टी-20 क्रिकेटरिषभ पंतआयपीएल २०२४आयपीएल लिलाव