Join us

BCCI गोलंदाजांचा 'अतिरिक्त बोनस' हिसकावून घेणार? पडद्यामागं नेमकं चाललंय काय?

बीसीसीआने खेळातील रंगत वाढवण्यासाठी IPL स्पर्धेत या नियमांचा समावेश केला होता.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 12:23 IST

Open in App

IPL 2025 BCCI to Review Bouncer And Impact Player Rule :  इम्पॅक्ट प्लेयरसह दुसऱ्या बाऊन्सरच्या नियमावर संध्या टांगती तलवार दिसत आहे. या दोन्ही नियमासंदर्भात बीसीसीआय रिव्ह्यू घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. बीसीसीआने खेळातील रंगत वाढवण्यासाठी IPL स्पर्धेत या नियमांचा समावेश केला होता.  

गोलंदाजांना मिळणार नाही दुहेरी मुभा? 

खरंतर बीसीसीआयने दोन्ही नियम देशांतर्गत क्रिकेटमधील सैय्यद मुश्ताक अली करंडक चषक स्पर्धेसाठी आणले होते. त्यानंतर त्याचा आयपीएलमध्ये समावेश करण्यात आला. पण बीसीसीआय या दोन्ही नियमांवर पुनर्विचार करत असल्यामुळे आगामी आयपीएल हंगामात गोलंदाजांना मिळणाऱ्या अतिरिक्त बाऊन्सरचा हक्क हिरावून घेण्यात येणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. गोलंदाजासाठी ही गोष्ट अतिरिक्त बोनसच आहे. काही आठवड्यांत यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. 

बीसीसीआय २ नियम कायम ठेवणार की,... 

आयपीएल २०२४ च्या हंगामात गोलंदाजाला एका षटकात दोन बाऊन्सर चेंडू टाकण्याची मुभा होती. या नियमाचे जोरदार स्वागतही झाले. टी२० क्रिकेटमध्ये फलंदाजाचा दबदबा दिसतो. एका षटकातील दोन बाउन्सर चेंडूच्या नियमामुळे त्यांना आवर घालण्यासाठी गोलंदाजांसाठी एक चांगले शस्त्रच मिळाले होते. पण ते शस्त्र आता पुढच्या हंगामात गोलंदाजांना वापरता येणार का? ते BCCI च्या रीव्ह्यू सिस्टीमवर अवलंबून आहे. ते गोलंदाजांना टेन्शन देणार की, फलंदाजांच टेन्शन कायम ठेवण्याला पसंती देणार ते नियम स्पष्ट झाल्यावरच समजेल. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका षटकात फक्त एक बाऊन्सर मारण्याला मुभा आहे.

दोन्ही नियम ठरताहेत चर्चेचा विषयक्रिकबझच्या वृत्तानुसार, इम्पॅक्ट प्लेयर आणि एका षटकातील दोन बाऊन्सर चेंडू टाकण्याच्या नियमावर बीसीसीआय पुर्विचार करत आहे. यासंदर्भात एका बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, इम्पॅक्ट प्लेयर आणि दोन बाऊन्सरच्या नियमासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. हे नियम कायम राहतील की, यात बदल होणार ते लवकरच कळेल. हे नियम लागू झाल्यापासून चर्चेत आहेत. काही दिग्गज त्यावर सकारात्मक दिसतात. तर काहींनी या नियमावर टीकाही केली आहे.

 

टॅग्स :बीसीसीआयआयपीएल २०२४आयपीएल किस्से