IPL 2025: बेन स्टोक्सचे कसोटीला प्राधान्य,आयपीएलमध्ये खेळणार नाही

IPL 2025: आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव २४- २५ नोव्हेंबरला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने आयपीएल लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाचे व्यस्त वेळापत्रक आणि कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी बेनने हा निर्णय घेतल्याचे समजते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 08:12 AM2024-11-03T08:12:25+5:302024-11-03T08:14:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025: Ben Stokes prefers Tests, won't play in IPL | IPL 2025: बेन स्टोक्सचे कसोटीला प्राधान्य,आयपीएलमध्ये खेळणार नाही

IPL 2025: बेन स्टोक्सचे कसोटीला प्राधान्य,आयपीएलमध्ये खेळणार नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव २४- २५ नोव्हेंबरला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने आयपीएल लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाचे व्यस्त वेळापत्रक आणि कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी बेनने हा निर्णय घेतल्याचे समजते.

तो याआधीच्या मेगा लिलावासही मुकला होता. तो आयपीएल २०२३ मध्ये चेन्नईसोबत शेवटचा सामना खेळला होता. स्टोक्सने माघार घेतल्यामुळे आयपीएलच्या नव्या नियमानुसार त्याला पुढील वर्षी होणाऱ्या मिनी लिलावात सहभागी होता येणार नाही. खेळाडूंनी वैध कारणाशिवाय माघार घेतल्यास त्यांना दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते. स्टोक्सने आयपीएल २०२३ मध्ये काहीच सामने खेळले. दुखापतीपूर्वी अंतिम संघाबाहेर राहिला. अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी त्याने आयपीएल २०२४ मधून माघार घेतली होती.

टेलिग्राफच्या वृत्तानुसार, बेन स्टोक्स पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकात तो शेवटचा टी-२० सामना खेळला. नंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली व पुन्हा २०२३ च्या विश्वचषकात खेळला होता. त्याने पुन्हा एकदा वनडे खेळण्याचे संकेत दिले आहेत. इंग्लंडने २०२५ चे कसोटी वेळापत्रक आधीच जाहीर केले. इंग्लंडच्या २०२५ च्या वेळापत्रकात बेन स्टोक्स भारताविरुद्धच्या घरच्या मालिकेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करेल.

काय आहे नियम...
बीसीसीआयने आयपीएल २०२५ पूर्वी नवीन नियम आणला. लिलावात नोंदणी केल्यानंतर खेळाडूची निवड झाली आणि त्याने पर्व सुरू होण्यापूर्वी माघार घेतली, तर त्याला दोन सत्र लीगमध्ये भाग घेण्यास आणि खेळाडूंच्या लिलावात नाव नोंदविण्यास बंदी घालण्यात येईल. हॅरी बूकने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माघार घेतल्याने हा नियम विशेषतः इंग्लंडच्या खेळाडूंसाठी आणण्यात आला, असे अनेकांना वाटते. फिल सॉल्ट आणि जोस बटलर यांनीही आयपीएल २०२४ प्ले ऑफ आधी माघार घेतली होती. त्यावरून संघ मालकांनी नाराजी व्यक्त केली होती.

Web Title: IPL 2025: Ben Stokes prefers Tests, won't play in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.