IPL 2025: CSKचा झेंडा घेऊन स्टेडियममध्ये जायचं नाही... लखनौमध्ये फॅन्सना आला विचित्र अनुभव (Video)

CSK flags not allowed video, IPL 2025 LSG vs CSK: चेन्नईचे झेंडे असलेल्या मुलींना बाहेर रोखण्यात आले अन् पुढे बरंच काही घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:14 IST2025-04-15T15:13:43+5:302025-04-15T15:14:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 CSK flags not allowed Fans had a strange experience in Lucknow LSG stadium video viral | IPL 2025: CSKचा झेंडा घेऊन स्टेडियममध्ये जायचं नाही... लखनौमध्ये फॅन्सना आला विचित्र अनुभव (Video)

IPL 2025: CSKचा झेंडा घेऊन स्टेडियममध्ये जायचं नाही... लखनौमध्ये फॅन्सना आला विचित्र अनुभव (Video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CSK flags not allowed video, IPL 2025 LSG vs CSK: सलग ५ पराभव पचवलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला अखेर एक सोमवारी लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध विजय मिळाला. लखनौच्या घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने लखनौचा ५ विकेट्सनी पराभव केला. सलामीचे दोन सामने गमावल्यानंतर लखनौने सलग सामने जिंकण्याचा सपाटा लावला होता. पण काल विजयाची मालिका खंडीत झाली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीच्या उपयुक्त खेळीच्या बळावर हे लक्ष्य १९.३ षटकांत ५ गडी राखून पूर्ण केले. या विजयाने चेन्नईचे चाहते खुश झाले. पण सामना सुरु होण्याआगोदर CSKच्या चाहत्यांना काही विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागले. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला.

नेमकं काय घडलं?

whistlepoduarmy आणि cskfansofficial या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात स्पष्टपणे दिसून येते की, TATA IPLचा टीशर्ट आणि गळ्या आयडी कार्ड घातलेली एक महिला CSKच्या तरुणींशी हुज्जत घातले. दोन मुलींकडे CSKचा झेंडा असतो. त्यांना चेन्नईला सपोर्ट करण्यासाठी हा झेंडा घेऊन स्टेडिममध्ये जायचे असते. पण तसे करू दिले जात नाही. IPLशी संबंधित महिला त्यांना झेंडा बाहेरच जमा करायला सांगते आणि स्टेडियममध्ये घेऊन जाण्यापासून रोखते. तुम्हाला आतमध्ये लखनौ संघाचा झेंडा घेऊन जाता येईल असे सांगत ती महिला त्यांच्याकडून चेन्नईचा झेंडा काढून घेते.


हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिण्यात आले आहे, 'झेंड्याची काठी काढून घेणे समजू शकतो पण झेंड्याचे कापड घेऊन जाण्यास परवानगी नाही, हा प्रकार समजण्यापलिकडला आहे. लखनौवाल्यांनो, तुम्ही झेंडे घेऊन जाण्यापासून रोखाल पण तुमच्या स्टेडियममध्ये चेन्नईच्या चाहत्यांचा जो पिवळा जनसागर उसळतोय ते कसा रोखाल.' दरम्यान, सामन्यानंतर CSKच्या चाहत्यांनी तुफान जल्लोष साजरा केला. आता त्यांचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सशी २० एप्रिलला होणार आहे.

Web Title: IPL 2025 CSK flags not allowed Fans had a strange experience in Lucknow LSG stadium video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.