IPL 2025 CSK vs DC 17th Match Player to Watch Kuldeep Yadav Delhi Capitals : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कुलदीप यादवदिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून मैदानात उतरतोय. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ चेपॉकच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. या खेळपट्टीवर 'चायनामन' कुलदीप घरच्या मैदानात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांसाठी आव्हान ठरू शकतो. त्याच्या रेकॉर्डवर आपण नजर टाकणारच आहोत. पण या भारतीय गोलंदाजाला 'चायनामन' का म्हणतात यामागची रंजक स्टोरी देखील आपण जाणून घेणार आहोत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लेफ्टआर्म रिस्ट स्पिनरला चायनामनचा टॅग कसा लागला?
ज्या चीनचा क्रिकेटमध्ये प्रभावच नाही, त्यांचा टॅग फिरकीपटूला चिकटण्यामागे एक खास इतिहास आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर डावखुऱ्या हाताने मनगटाच्या जोरावर चेंडू वळवण्याची क्षमता असणाऱ्या गोलंदाजाला 'चायनामन' असे संबोधले जाते. उजव्या हाताचा लेग स्पिनरचा चेंडू पडल्यावर फलंदाजापासून बाहेरच्या बाजूला वळवतो. या उलट डाव्या हाताच्या लेग स्पिनरचा चेंडू फलंदाजाच्या दिशेने वळतो. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये चीनला धमक दाखवता आलेली नसली तरी. डावखुऱ्या हाताने मनगटाच्या जोरावर चेंडू वळवणारा (लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनर) हा चीनचा होता. एलिस अचोंग असं या गोलंदाजाचे नाव. १९३३ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघानं या चीनी वशांच्या खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले होते. इंग्लंडचा दिग्गज वॉल्टर रॉबिन्स हा वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील चीनी वंशाच्या गोलंदाजाच्या फिरकीवर फसला. चीन गोलंदाज अजब गजब प्रकारे गोलंदाजी करतोय असं म्हणत त्याने पॅव्हॅलियनचा रस्ता धरला. अन् या गोलंदाजी शैली 'चायनामन' नावाने लोकप्रिय झाली.
Tilak Varma Retired Out : आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आउट होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक वर्मा
कुलदीप हा पहिला 'चायनामन' भारतीय फिरकीपटू नाही, तर...
क्रिकेटच्या मैदानात अनेक फिरकीपटू झाले. पण डावखुऱ्या हाताने मनगटाच्या जोरावर फलंदाजांची फिरकी घेणाऱ्या गोलंदांची यादीत मोजकेच खेळाडू आहेत. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात जवळपास ३० गोलंदाजांनी या गोलंदाजी शैलीसह खास छाप सोडली आहे. ब्रॅड हॉग आणि पॉल एडम्स यासारख्या नावांसह कुलदीप यादवचा यात समावेश आहे. आता कुलदीप पुरुष क्रिकेटमध्ये भारताचा पहिला लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनर आहे. पण चायनामनच्या धाटणीत गोलंदाजीच्या रुपात भारताचा पहिला चेहरा ही एक महिला क्रिकेटर आहे. प्रीती डिमरी ही या धाटणीत गोलंदाजी करणारी पहिली भारतीय फिरकीपटू ठरली. आता कुलदीप या शैलीतील गोलंदाजीनं आपली छाप सोडताना दिसते.
कुलदीप यादवचा आयपीएलमधील रेकॉर्ड
कुलदीप यादवनं २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. २०१८ च्या हंगमात १६ सामन्यात १७ विकेट्स घेऊन त्याने आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली. २०२१ मध्ये दुखापतीमुळे तो या प्रतिष्ठीत स्पर्धेपासून दूर राहिला. २०२२ च्या हंगामापासून त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ८६ सामन्यात त्याने ९२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.