Join us

IPL च्या इतिहासात CSK वर पहिल्यांदाच आली ही वेळ! आता बालेकिल्ल्यात KKR नं दिला दणका

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका हंगामात चेन्नईच्या संघाने कधीच सलग पाच सामने गमावले नव्हते.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 22:34 IST

Open in App

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders, 25th Match : कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला एकहाती पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे बालेकिल्ल्यात CSK च्या संघाच्या नावे निच्चांकी धावसंख्येची नोंद झाली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने स्फोटक अंदाजात बॅटिंग करत सामना खिशात घातला. या पराभवासह चेन्नई सुपर किंग्जच्या संघाच्या पदरी ६ व्या सामन्यात पाचवा पराभव पदरी आला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका हंगामात चेन्नईच्या संघाने कधीच सलग पाच सामने गमावले नव्हते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

घरच्या मैदानात पराभवाची हॅटट्रिक

यंदाच्या हंगामात घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जनं सलग तिसरा सामना गमावला आहे. आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १७ वर्षांनी चेन्नईला बालेकिल्ल्यात पराभूत करून दाखवले.  दिल्ली कॅपिटल्सनंही चेन्नईला सोडले नाही. आता कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने चेपॉकच्या मैदानात रात्र गाजवली. 

चाहते सोडा! CSK ची बॅटिंग बघून चीअर लीडर्सचाही पडला चेहरा; घरच्या मैदानात लाजिरवाणी कामगिरी

चेन्नईच्या संघानं कसाबसा गाठला होता १०३ धावसंख्येचा आकडा

पहिल्यांदा फलंदाजी करताना विजय शंकरनं २१ चेंडूत केलेल्या धावांशिवाय शिवम दुबेनं केलेल्या २९ चेंडूतील ३१ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने धावफलकावर कशाबशा १०३ धावा केल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सुनील नरेन याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीनं आपल्या खात्यात प्रत्येकी २-२ विकेट्स जमा झाल्या. वैभव अरोरा आणि मोईन अली यांनीही प्रत्येकी १-१ विकेट घेतली. 

बॉलिंगनंतर सुनील नरेन याची कडक फटकेबाजी, KKR नं ६१ चेंडूत जिंकला सामना

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दिलेल्या तोकड्या धावांचा पाठलाग करताना सुनील नरेन आणि क्विंटन डिकॉक यांनी स्फोटक अंदाजात फलंदाजी केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी २५ चेंडूत ४६ धावांची भागीदारी रचली. क्विंटन डिकॉक १६ चेंडूत ३ षटकाराच्या मदतीने २३ धावा करून परतल्यावर सुनील नरेन याने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने १८ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ४४ धावा करत सामना एकहाती कोलकाताच्या बाजूने फिरवला. कर्णधार अजिंक्य रहाणे २० (१७) आणि  रिंकू सिंह १५ (१२)  या जोडीनं शेवटपर्यंत मैदानात थांबत ११ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सामना संपवला.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सइंडियन प्रीमिअर लीगमहेंद्रसिंग धोनी