आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २५ वा सामना एम ए चिदंबरम स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ पुन्हा एकदा आपल्या जुन्या आणि यशस्वी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षणाचाही विचार न करता पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅप्टन कूल धोनीनं केली रोहितची कॉपी, पण...
दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीनं टॉस गमावल्यावर रोहित शर्माची कॉपी केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही काळात भारतीय संघाचे नेतृत्व करताना रोहित शर्मा सातत्याने टॉस गमावताना दिसला. त्यानंतर तो जे मिळालं तेच आम्हाला करायचं होते, असे सांगताना दिसून आले. धोनीनंही तेच केले. पण तो आम्हाला बॅटिंगच करायची होती एवढे सांगून थांबला नाही. तर त्याने यामागची भूमिकाही एकदम स्पष्ट केली. त्याने आपल्या वक्तव्यातून आपले इरादेच स्पष्ट केले. त्यामुळेच त्याचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
IPL 2025 ...अन् आता रंगलीये ऋतुराजने कॅप्टन कूल धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा
काय म्हणाला धोनी?
कोलकाता विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा नेतृत्व करतण्यासाठी मैदानात उतरलेला धोनी टॉसनंतर म्हणाला की, आम्हाला पहिल्यांदा फलंदाजीच करायची होती. या हंगामात धावांचा पाठलाग करताना आम्ही अपयशी ठरलोय. डावाची सुरुवात चांगली झाली नाही तर मध्य फळीतील फलंदाजीवर दबाव येतो. आम्ही खूप सामने गमावले आहेत. बेसिक गोष्टी सुधारण्यावर फोकस आहे. काही सामन्यात मोठ्या फरकाने पराभव झाला. पण काही सामन्यात आम्ही काही हिट्स कमी पडलो, असे सांगत धोनीनं चुका सुधारून ट्रॅकवर येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलून दाखवले.