CSK vs RCB The Celebrations Of Virat Kohli And Josh Josh Hazlewood : चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्यांदा बॅटिंग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं चेन्नई सुपर किंग्जच्या संघासमोर निर्धारित २० षटकात ७ बाद १९६ धावा करत १९७ धावांचे टार्गेट सेट केले आहे. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. सलामीवीर राहुल त्रिपाठीसह कर्णधार ऋतुराज गायकवाड स्वस्तात माघारी फिरला. एवढेच नाही तर दीपक हुड्डाच्या रुपात CSK नं पॉवर प्लेमध्ये आपली तिसरी विकेट गमावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोस हेजलवूडनं एकाच षटकात घेतल्या दोन विकेट्स
ऑस्ट्रेलियन जोस हेजलवूडनं संघाकडून घेऊन आलेल्या दुसऱ्या आणि आपल्या वैयक्तिक पहिल्याच षटकात आधीर राहुल त्रिपाठी ५(३) आणि त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला तंबुचा रस्ता दाखवला. ऋतुराजला खातेही उघडता आले नाही. त्याची विकेट मिळाल्यावर विराट कोहलीचा आनंद बघण्याजोगा होता.
IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं?
कोहली अगदी वेताळासारखा जोश हेजवूडच्या खांद्यावर बसला
फिल्डवर किंग कोहलीचा अंदाज हा नेहमीच लक्षवेधी ठरताना दिसते. तो टीम इंडियातून खेळत असो किंवा फ्रँचायझी संघाकडून मैदानात उतरलेला असो. मैदानात उतरल्यावर त्याचा उत्साह हा बघण्याजोगा असतो. त्यात विकेट मिळाली अन् संघ मजबूत स्थितीत असेल तर बोलायलाच नको. जोस हेजलवूडनं ऋतुराजची विकेट घेतल्यावर कोहलीनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या खांद्यावर उडी मारत विकेटचं खास अंदाजात सेलिब्रेशन केलं. दोघांच्यातील हा सीन 'विक्रम वेताळ' या गोष्टीतील पोस्टरची आठवण करून देणारा होता.