चेपॉकवर दिसला तो फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी! कोहलीनं CSK च्या गोलंदाजाला दिली वॉर्निंग?

विराट कोहली आणि खलील अहमद यांचा मॅचनंतरचा व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:34 IST2025-03-29T17:18:29+5:302025-03-29T17:34:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli Angry With Khaleel Ahmed RCB Batter Gave Wwarning After Match Video Goes Viral | चेपॉकवर दिसला तो फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी! कोहलीनं CSK च्या गोलंदाजाला दिली वॉर्निंग?

चेपॉकवर दिसला तो फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी! कोहलीनं CSK च्या गोलंदाजाला दिली वॉर्निंग?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CSK vs RCB Virat Kohli Angry on Khaleel Ahmed Viral Video : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं शुक्रवारी चेपॉकच्या मैदानात अखेर चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करून दाखवलं. १७ वर्षांनी आरसीबीच्या संघानं एम. ए. चिदंबरम स्टेडियवर आयपीएल स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा भारताचा जलदगती गोलंदाज खलील अहमद आणि आरसीबीचा स्टार विराट कोहली यांच्यात खुन्नस पाहायला मिळाली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!


विराट विरुद्ध खलील अहमदनं खेळला स्लेजिंगचा खेळ


 
मैदानात "आँखो ही आँखो में इशारा" करणाऱ्या किंग कोहलीनं मॅच संपल्यावर खलील अहमदची मैदानातील कृती विसरणार नाही, अशा तोऱ्यात त्याला धमकावल्याचा सीनही पाहायला मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.  रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात खलील अहमद अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसले. आरसीबीच्या खेळाडूंना बॅकफूटवर ढकलण्यासाठी खलील अहमदनं स्लेजिंगचा डावही खेळला. विराट कोहली फलंदाजीला असताना त्याचे तेवर बघण्याजोगे होते. यावर कोहलीचा रिप्लायही पाहायला मिळाला होता. पण आता या दोघांमधील मॅच नंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

कोहलीनं साधला मोठा डाव; गब्बरचा विक्रम मोडत ठरला CSK विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा 'किंग'

सामना संपल्यावर कोहलीनं असा काढला राग

चेन्नई विरुद्धचा सामना जिंकल्यावर विराट कोहलीता आनंद गगनात मावेना, असे चित्र पाहायला मिळाले. पण खलील त्याच्यासमोर आला अन् मग किंग कोहलीचा मूडच बदलला. विराट कोहली आणि खलीलचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात कोहली चेन्नईच्या ताफ्यातील भारतीय गोलंदाजावर चिडल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला खलील जे झालं ते विसरुन कोहलीसोबत हात मिळवणी करण्यासाठी उत्सुक दिसला. पण कोहलीचा मूड मात्र वेगळाच होता. 

खलीलच काही खरं नाही, विराट आपल्या घरच्या मैदानातही काढू शकतो त्याच्यावरील राग 


आयपीएल स्पर्धेतील साखळी फेरीत ३ मेला  बंगळुरुच्या मैदानात आरसीबी आणि सीएसके यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यात विराट-खलील यांचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो, याचे संकेतच सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून मिळतात. बंगळुरुची खेळपट्टी ही  फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. इथं  खलील अहमद विरुद्ध विराट यांच्यातील एक वेगळा सामना पाहायला मिळू शकतो.
 

Web Title: IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli Angry With Khaleel Ahmed RCB Batter Gave Wwarning After Match Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.