Join us

IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं?

खलील अहमदनं खुन्नस दिली, कोहलीनं काही न बोलता त्याला असा दिला रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 21:25 IST

Open in App

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामनाही चांगलाच रंगतदार होता. दोन संघ मैदानात उतरल्यावर दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळते. चेपॉक स्टेडियमवर तो सीनही दिसला. याशिवाय मैदानात दोन खेळाडूंमध्ये खुन्नसही पाहायला मिळाली. आरसीबीच्या ताफ्यातील स्टार बॅटर विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्जचा जलदगती गोलंदाज खलील अहमद यांच्यातील ते दृश्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

खुन्नस देणाऱ्याला भारतीय गोलंदाजाला कोहलीनं असा दिला रिप्लाय , नेमकं काय घडलं?   

टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरल्यावर आरसीबीकडून फिल सॉल्टनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राइकवर असलेला विराट कोहली मात्र संघर्ष करताना दिसून आले. आरसीबीच्या डावातील तिसऱ्या षटकात खलील अहमदनं विराट कोहलीला चकवा दिला अन् चेंडू पॅडवर लागला. कोहलीच्या विकेटसाठी अपील केल्यावर धोनीच्या सल्ल्यानं ऋतुराजनं रिव्ह्यू घेतला. पण तो वाया गेला. त्यानंतर खलील अहमदनं उसळी घेणारा चेंडू टाकत कोहलीला निर्धाव चेंडू टाकला. या षटकात खलील अहमद कोहलीला खुन्नस देताना दिसले.  त्याला कोहलीनं दिलेला रिप्लाय बघण्याजोगा होता.  काहीही न बोलता कोहलीनं  नजरेतून आपला राग व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. 

MS Dhoni Faster Than Light Stumping : धोनीनं विकेटमागे सॉल्टची केलेली 'शिकार' बघून कोहलीही स्तब्ध

सलामीच्या लढतीत नाबाद अर्धशतकी खेळी करणारा कोहली दुसऱ्या सामन्यात धावांसाठी संघर्ष करताना दिसला. त्याने ३० चेंडूत ३१ धावांची खेळी करताना २ चौकार आणि १ षटकार मारला. पण लेफ्ट आर्म स्पिनर नूर अहमदच्या गोलंदाजीवर तो फसला. त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. दुसरीकडे खलील अहमदनं कोहलीला चांगली गोलंदाजी केली, पण त्याने जे तेवर दाखवले ते कोहलीच्या चाहत्यांना खटकणारे असे होते. जितेश शर्माच्या रुपात त्याने एक विकेट घेतली. पण त्याच्या गोलंदाजीतील कामगिरीशिवाय किंग कोहली विरोधात त्यानं दाखवलेला अंदाज चर्चेत आहे.  हा विषय या मॅचसोबत संपणार की, पुन्हा दोघांच्यात असाच सामना पाहायला मिळणार ते बघण्याजोगे असेल. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५विराट कोहलीचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर