DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!

..अन् तिलक वर्मानं पुन्हा पेश केला आपल्या भात्यातील अति सुंदर फटकेबाजीचा खास नजराणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 21:43 IST2025-04-13T21:37:41+5:302025-04-13T21:43:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 DC vs MI Tilak Varma Back to Back Fifties After Retired Out Celebration Say Somthing Happiness On Rohit Sharma's Face Suryakumar Yadav Standing Ovation | DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!

DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 DC vs MI Tilak Varma Back to Back Fifties After Retired Out : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील स्टार बॅटर तिलक वर्मा याने दिल्लीच्या मैदानातही आपला तोरा दाखवला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने सलग दुसऱ्या अर्धशतकाची नोंद केली. लखनौ विरुद्धच्या सामन्यात रिटायर्ड आउटच्या रुपात झालेल्या अपमनानंतर त्याने पुन्हा एकदा आपली धमक दाखवून दिली. LSG विरुद्ध जे घडलं ती गोष्ट त्याने लयच मनावर घेतलीये. अर्धशतक झळकावल्यावर त्याने केलेले सेलिब्रेशनमध्ये अगदी तसेच काहीसे दिसून आले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

२६ चेंडूत साजरे केले अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्माच्या रुपात मंबई इंडियन्सच्या संघाने पॉवर प्लेमध्येच पहिली विकेट गमावली. मग मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादवच्या भात्यातून आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळाली. रायन रिकल्टन छोटीखानी पण उपयुक्त खेळी करून तंबूत परतल्यावर तिलक वर्मा मैदानात आला. त्याने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर चौकार मारत खाते उघडत आपले इरादे स्पष्ट केले. त्याने आपल्या भात्यातून रिव्हर्स स्वीपचाही नजराणा पेश केला. २६ चेंडूत त्याने यंदाच्या हंगामातील सलग दुसऱ्या अर्धशतकाची नोंद केली. 

IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!

तिलक वर्माच खास सेलिब्रेशन अन् रोहित शर्मासह  सूर्याला झालेला आनंद 

तिलक वर्मानं सलग दुसऱ्या अर्धशतकानंतर बॅट आपल्या जर्सीवर लिहिलेल्या नावाकडे दाखवत मी तिलक वर्मा...अशा तोऱ्यात सेलिब्रेशन केले.  त्याच्या दमदार खेळीनंतर ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या रोहित शर्माचा आनंदही बघण्याजोगा होता. सूर्यकुमारसह रोहितनं युवा बॅटरच्या कडक अंदाजातील खेळीला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. तिलक वर्मानं दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात ३३ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५९ धावांची दमदार खेळी केली. जी संघाकडून सर्वोच्च खेळी ठरली.

Web Title: IPL 2025 DC vs MI Tilak Varma Back to Back Fifties After Retired Out Celebration Say Somthing Happiness On Rohit Sharma's Face Suryakumar Yadav Standing Ovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.