IPL 2025 : RCB सह DC साठी बिन कामाचा ठरला! मग RR नं दाखवला या 'हार्ड हिटिंग फिनिशर'वर भरवसा

राजस्थान रॉयल्सच्या संघात शिमरॉन हेटमार ही भूमिका बजावताना दिसतोय. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 11:25 IST2025-04-16T11:15:36+5:302025-04-16T11:25:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 DC vs RR 32nd Match Lokmat Player to Watch Shimron Hetmyer Rajasthan Royals | IPL 2025 : RCB सह DC साठी बिन कामाचा ठरला! मग RR नं दाखवला या 'हार्ड हिटिंग फिनिशर'वर भरवसा

IPL 2025 : RCB सह DC साठी बिन कामाचा ठरला! मग RR नं दाखवला या 'हार्ड हिटिंग फिनिशर'वर भरवसा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 DC vs RR 32nd Match Player to Watch Shimron Hetmyer Rajasthan Royals : आयपीएलमध्ये प्रामुख्याने फलंदाजांचा जलवा पाहायला मिळतो. टी-२० क्रिकेटमध्ये मोठी फटकेबाजी ही फ्रँचायझी संघाचीच नाही तर क्रिकेट चाहत्यांचीही डिमांड आहे. त्यामुळेच बहुतांश संघ सातव्या-आठव्या क्रमांकापर्यंत मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूंसह मैदानात उतरण्याला प्राधान्य देताना दिसते. प्रत्येक संघात एक असा फलंदाज असतो जो 'हार्ड हिटिंग फिनिशर'च्या रुपात खेळताना दिसतो. राजस्थान रॉयल्सच्या संघात शिमरॉन हेटमार ही भूमिका बजावताना दिसतोय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

संजू, यशस्वी अन् रियानप्रमाणेच हेटमायरवर मोठी जबाबदारी 

या खास जबाबदारीमुळे कॅरेबियन खेळाडू हा राजस्थानच्या संघात कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग या भारतीय स्टार इतकाच महत्त्वपूर्ण ठरतो. लोअर मिडल ऑर्डरमध्ये मोठी फटकेबाजी करत सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. २०२२ च्या हंगामापासून शिमरॉन हेटमायर राजस्थान रॉयल्स संघाचा प्रमुख खेळाडू आहे.

IPL 2025: राहुल द्रविड बरोबर दिसणारी 'ही' तरूणी कोण? राजस्थान रॉयल्सशी कनेक्शन काय?

RCB सह DC साठी बिन कामाचा ठरला

२०१९ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून शिमरॉन हेटमायरनं आयपीएलमध्ये पदार्पण केले. या हंगामात त्याला ५ सामन्यात संधी मिळाली. यात ७५ धावांच्या सर्वोच्च खेळीसह त्याने फक्त ९० धावा काढल्या. २०२० च्या हंगामात तो दिल्ली फ्रँचायझीकडून खेळताना दिसले. या हंगामात १२ सामन्यात त्याने १८५ धावा केल्या. २०२१ च्या हंगामात १४ सामने खेळताना त्याने एका अर्धशतकासह २४२ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. या दोन्ही संघाकडून त्याला विशेष छाप सोडण्यात अपयश आले. 

RR ताफ्यातून खेळताना पदार्पणाचा हंगाम गाजवला, आता... 

२०२२ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. राजस्थानकडून पदार्पण करताना १५ सामन्यात त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने ३१४ धावा केल्या होत्या. ही त्याची आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे. २०२३ च्या हंगामातही त्याने ३०० धावांचा आकडा गाठला होता. गत हंगामात १२ सामन्यात फक्त ११३ धावा करताना २७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पण तरीही राजस्थानच्या संघाने त्याच्यावरील भरवसा कायम ठेवला. यंदाच्या हंगामात त्याच्या भात्यातून एक अर्धशतकही आले आहे. कामगिरीतील सातत्य टिकवून तो संघासाठी कितपत उपयुक्त ठरणार ते पाहण्याजोगे असेल.

शिमरॉन हेटमायरची यंदाच्या हंगामातील कामगिरी

यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबद विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळताना शिमरॉन हेटमायरच्या भात्यातून २३ चेंडूत ४२ धावांची खेळी आली होती.  कोलकाता विरुद्धच्या सामन्यात तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात तो फ्कत ७ धावा करू शकला. चेन्नई विरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १६ चेंडूत १९ धावांची खेळी केली होती. पंजाब किंग्जविरुद्ध तो पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसला. या सामन्यात त्याने १२ चेंडूत २० धावा केल्या. गुजरात विरुद्धच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावरखेळताना त्याने यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक साजरे केले. ३२ चेंडूत त्याच्या भात्यातून ५२ धावांची खेळी आली. बंगळुरु विरुद्ध तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण  या सामन्यात तो दुहेरी आकडाही गाठू शकला नव्हता. त्याची खेळी ८ चेंडूत ९ धावांवरच संपुष्टात आली. गरजेनुसार संघ त्याच्या बॅटिंग ऑर्डमध्ये बदल करताना दिसते. 

Web Title: IPL 2025 DC vs RR 32nd Match Lokmat Player to Watch Shimron Hetmyer Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.