IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा!

जाणून घेऊयात काव्या मारनच्या ताफ्यातील अनकॅप्ड भारतीय 'बिग हिटर'संदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 07:40 IST2025-03-30T07:30:54+5:302025-03-30T07:40:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 DC vs SRH 10th Match Lokmat Player to Watch Aniket Verma Sunrisers Hyderabad | IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा!

IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 DC vs SRH 10th Match Player to Watch Aniket Verma Sunrisers Hyderabad : काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात 'एक से बढकर एक हिटर' असल्याचे पाहायला मिळते. या गर्दीत अनकॅप्ड युवा भारतीय पोरानंही आपली छाप सोडलीये. अनिक वर्मा असं या पोराचं नाव. ज्या २३ वर्षीय पोरावर काव्या मारन हिने ३० लाखांचा डाव खेळलाय त्याच्या तो कोट्यवधीसह खेळणाऱ्या ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेन्री क्लासेन यांच्या तोडीस तोड कामगिरी करण्याची क्षमता असणारा खेळाडू  आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काव्याच्या ताफ्यातील अनकॅप्ड भारतीय बिग हिटरची खास गोष्ट

पदार्पणाच्या सामन्यात त्याचा खेळ अवघ्या ३ चेंडूत खेळ खल्लास झाला. पण एक षटकार मारत त्याने पहिल्याच सामन्यात 'छोटा पॅक बडा धमाका' धाटणीतील खेळाडू असल्याची झलक दाखवून दिली. दुसऱ्या सामन्यात त्याच्या भात्यातून  १३ चेंडूत ५ षटकाराच्या मदतीने आलेली ३६ धावांची खेळी हैदराबादच्या ताफ्यात बिग हिटरची कमी नाही, हेच दाखवणारी होती. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सहज सोपा नव्हता. अनेक अडथळे पार करत जिद्दीच्या जोरावर तो इथं पोहाचलाय. जाणून घेऊयात काव्या मारनच्या ताफ्यातील युवा बिग हिटरसंदर्भातील खास स्टोरी

रिक्षा चालकाच्या पोराचं दमदार पदार्पण! कोण आहे MI चा 'इम्पॅक्ट प्लेयर' Vignesh Puthur?

कोचनं ट्रेनिंगसह स्वत:च्या घरात राहायला जागा देत घडवलाय हा हिरा

सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळणारा अनकॅप्ड भारतीय युवा क्रिकेटर अनिकेत वर्मा हा मध्य प्रदेशातील आहे. या क्रिकेटरच्या यशात भोपाळमधील त्याचे प्रशिक्षक नंदजीत यांचा वाटा खूप मोलाचा आहे. त्यांनी अनिकेतला फक्त क्रिकेटचे धडेच दिले नाही, तर आपल्या घरात राहण्यासाठी जागा देऊन या पठ्याला घडवण्याचे काम केले. 

आधी MP प्रिमियर लीगमध्ये चमकला; आता IPL मध्ये झालाय  काव्या मारनच्या ताफ्यातील नवा हिरो

एमपी प्रीमियर लीगमध्ये अनिकेतनं आपल्यातील धमक दाखवून दिली.  या लीगमध्ये ३२ चेंडूत ३ षटकाराच्या मदतीने शतक मारल्यावर तो प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील ६ सामन्यात त्याने १९५ च्या स्ट्राइक रेटसह ५४.६ च्या सरासरीनं सर्वाधिक २७३ धावा ठोकल्या होत्या. एवढेच नाही तर स्पर्धेत सर्वाधिक २५ षटकार मारण्याचा रेकॉर्डही त्याने आपल्या नावे केला होता. याच कामगिरीच्या जोरावर आयपीएलमधील वेगवेगळ्या फ्रँचायझींच्या नजरा त्याच्यावर पडल्या. SRH च्या संघाची ट्रायल सर्वात भारी झाली अन्  तो या संघाचा भाग झाला. आता तो काव्या मारनच्या ताफ्यातील नव्या हिरोच्या रुपात समोर येताना दिसतोय. मेगा लिलावात बोली लागल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याच्यासाठी दरवाजे उघडले. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी त्याची  मध्य प्रदेश संघातही निवड झाल्याचे पाहायला  मिळाले.

Web Title: IPL 2025 DC vs SRH 10th Match Lokmat Player to Watch Aniket Verma Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.