Terrible Mix-up With Travis Head Leads To Abhishek Sharma Runout : विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादची अवस्था एकदम बिकट झाल्याचे पाहायला आहे. फक्त मारुन खेळण्याच्या पॅटर्नमध्ये अभिषेक शर्मा एकेरी धाव घ्यायला विसलाय की, काय असे काहीसे दृश्य पाहायला मिळाले. ट्रॅविस हेडनं एका धावेसाठी कॉल केल्यावर हा ना करत तो धाव घेण्यासाठी बाहेर पडला, पण पण विपराज निगमन चपळ क्षेत्ररक्षण करत त्याला त्याचा खेळ खल्लास केला. हैदराबादच्या संघानं पहिल्या षटकात फुकट आपली विकेट गमावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हिट जोडी, दोघांच्यात कमालीचा ताळमेळही दिसतो, पण यावेळी गडबड झाली
ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा ही दोघे आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट क्रमवारीत नंबर एक आणि नंबर दोनवर असणारे फलंदाज आहेत. हैदराबादच्या संघाला या जोडीकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असते. आयपीएलमधील ही हीट जोडी आहे. दोघांच्यात कमालीचा ताळमेळही पाहायला मिळतो. पण दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात ते दिसलं नाही. चोरटी धाव घेण्याच्या नादात ही जोडी फुटलमी म्हणण्यापेक्षा सिंगलचा अप्रोच नसल्यामुळे संघाला फटका बसला असाच हा सीन होता. डोक्यात फक्त मोठे फटकेबाजी करुन धावा करायचं ठेवल्यामुळेच अभिषेकवर ही वेळ आली का? असाही प्रश्न पडतो.
IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा!
बिग हिटरला याआधी युवीनंही मारलाय टोमणा
अभिषेक शर्मा हा सिंगल डबल धावा घेण्यापेक्षा फक्त मोठ्या फटकेबाजी करण्यावर भर देताना दिसते. हा पठ्ठ्या युवराज सिंगच्या तालमीत घडलाय. त्यानं आक्रमक अंदाजातील फटकेबाजी करावी, पण कधी कधी एकरी दुहेरीही धाव घ्यावी, अशी मजेशीर कमेंट युवीनं केल्याचे पाहायला मिळाले होते. गुरुचा हा सल्ला जरी लक्षात ठेवला असता तर कदाचित अशी रन आउटच्या रुपात विकेट फेकण्याची वेळ त्याच्यावर आली नसती. रन आउट झाल्यावर चूक कुणाची? असा प्रश्नही अनेकदा पडतो. अभिषेकचा व्हिडिओ पाहिल्यावर त्याने सिंगल घेण्याचा अप्रोच दाखवलेला नाही असेच दिसून येते. फक्त मोठी फटकेबाजी करुनच धावा करायच्या नादात सिंगल घेण्यात आळस त्याला चांगलाच महागात पडल्याचे दिसते.