IPL 2025 Schedule: आयपीएलची उत्सुकता! वेळापत्रक कधी येणार? यासंदर्भातील मोठी माहिती आली समोर

सगळं ठरलंय, पण वेळापत्रक कधी येणार? जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:02 IST2025-02-11T09:52:51+5:302025-02-11T10:02:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Full Schedule Set To Be Announced Next Week Reports | IPL 2025 Schedule: आयपीएलची उत्सुकता! वेळापत्रक कधी येणार? यासंदर्भातील मोठी माहिती आली समोर

IPL 2025 Schedule: आयपीएलची उत्सुकता! वेळापत्रक कधी येणार? यासंदर्भातील मोठी माहिती आली समोर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 Schedule: आयपीएल २०२५ स्पर्धेची मोठी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.  १८ व्या हंगामाची सुरुवात २१ मार्चला होणार आहे. याची पुष्टी बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका कार्यक्रमामध्ये केली होती. आता या स्पर्धेचे वेळापत्रक कसे असेल? याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. या आठवड्यात कोणता संघ कधी अन् कुणाविरुद्ध भिडणार यासंदर्भातील माहिती समोर येईल, अशी चर्चा रंगली  होती. आता आयपीएल वेळापत्रकासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. आयपीएलचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असा दावा एका वृत्तातून करण्यात आला आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कोलकाताच्या मैदानातू हे दोन संघ करतील स्पर्धेचा शुभारंभ

आयपीएल २०२५ च्या हंगामासंदर्भात सलामीची लढत आणि प्लेऑफच्या लढतीसंदर्भात याआधी समोर आलेल्या माहितीनुसार, कोलताकाच्या ईडन गार्डन्सच्या मैदानातून यंदाच्या हंगामाचा शुभारंभ होणार आहे. आयपीएल स्पर्धेतील नियमानुसार, गत विजेत्यांच्या मैदानातून नव्या हंगामाची सुरुवात होते. त्यामुळे सलामीची लढत कोलकाताच्या मैदानात रंगणार हे जवळपास निश्चित आहे. गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात फायनल सामना रंगला होता. गत हंगामातील हे दोन फायनलिस्ट ईडन गार्डन्सच्या मैदानातून १८ व्या हंगामातील सलामीची सामना खेळतील, असे अपेक्षित आहे. 

इथं रंगल्याचे पाहायला मिळू शकते फायनलसह क्लालिफायर अन्ए लिमिनेटरच्या लढती

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील फायनल लढत देखील कोलकाताच्या मैदानावरच नियोजित असल्याचे बोलले जाते. प्ले ऑफमधील दुसरी लढतही कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगल्याचे पाहायला मिळू शकते. याशिवाय दुसरी प्ले ऑफ आणि एलिमिनेटर लढत सनरायझर्स हैदराबादच्या घरच्या मैदानात अर्थात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळू शकते. अद्याप अधिकृतरित्या यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. वेळापत्रक समोर आल्यावरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

दिल्ली कॅपिटल्स अन् राजस्थान रॉयल्स घरच्या बाहेर खेळणार दोन लढती?

वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ घरच्या मैदानातील दोन लढती बाहेर खेळताना दिसू शकतील. गत हंगामाप्रमाणे दिल्ली कॅपिटल्सचा संघ आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन-विशाखापट्टणम् जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदानावर आपल्या दोन लढती खेळेल, अशी अपेक्षा आहे. राजस्थान फ्रँचायझी संघाचे दोन सामन्यासाठी घरचे मैदान नेमकं कोणतं असणार हे अजून  गुलदस्त्यातच आहे.

Web Title: IPL 2025 Full Schedule Set To Be Announced Next Week Reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.