Join us

GT vs MI : पांड्या भाऊसाठी 'अच्छे दिन'! “केम छो? मजा मां छे”... सवाल-जवाबासह 'हार्दिक' स्वागताची घडी

आधी झालं ते विसरा. यावेळी परिस्थिती बदललीये. त्यामुळेच यावेळी पुन्हा दिसेल हार्दिक पांड्याचा स्वॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 10:42 IST

Open in App

IPL 2025 GT vs MI 9th Match Player to Watch Hardik Pandya Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या संघानं यंदाच्या हंगामाची सुरुवात 'पहिली मॅच' देवाला अशाच काहीशा जुन्या अंदाजात केली. आता दुसऱ्या सामन्यात संघ पहिला विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. गत हंगामातील स्लो ओव्हर रेटमुळे झालेल्या बंदीच्या कारवाईमुळे तो सलामीच्या लढतीला मुकला होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

“केम छो? मजा मां छे”...

ज्या गुजरात टायटन्स संघाला त्याने पदार्पणात जेतेपद मिळवून दिले त्यांच्या विरुद्धच्या लढतीनं हार्दिक पांड्या यंदाच्या मोहिमेची सुरुवात करेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर “केम छो? मजा मां छे” अशा सवाल जवाबासह हार्दिक पांड्याचे स्वागत होईल. जे आधी सहन करावं  लागलं ते यावेळी पांड्याबाबतीत घडणार नाही, त्यामुळे पांड्यासाठी हा क्षण खास असेल.  

हार्दिक पांड्या म्हणाला, आयुष्यातील वाईट दिवस गरकन फिरले; हे सगळे फक्त अडीच महिन्यात घडले

 गत हंगामात अडकित्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली होती अवस्था  गत हंगामा हार्दिक पांड्याची चांगलीच गोची झाली होती. एका बाजूला गुजरात टायटन्सचा संघ सोडल्यामुळे या संघाचा चाहतावर्ग दुखावला गेला. दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी केल्यावर रोहित शर्माची जागा त्याला दिल्यानं चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पांड्याची अवस्था अडकित्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली होती. पण यावेळी परिस्थिती बदललीये. त्यामुळेच यावेळी हार्दिक पांड्याचा स्वॅग पुन्हा दिसून येईल.  

वर्ल्ड चॅम्पियन टॅगनं  हार्दिक पांड्याच्या बाजूनं फिरलं वारं

प्रत्येक क्रिकेटरला आपल्या कारकिर्दीत चढ उतारांचा सामना करावा लागतो. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे बॅड पॅचचा सामना करून सावरणं एक वेळ सोपे, पण चाहत्यांच्या रोषाचा सामना केल्यावर त्यातून उभे राहण अधिक मुश्किल असू शकते. पण हार्दिक पांड्या त्यातून बाहेर पडला. एका बाजूला वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या मैदानात त्याच्यासंदर्भात रंगलेल्या नकारात्मक चर्चेला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याच्या कामगिरीनं थांबली. यात चॅम्पियन्स ट्रॉफीची भर पडली आणि आता वारं पुन्हा पांड्याच्या बाजूनं फिरलं. अहमदाबादच्या मैदानात “केम छो? मजा मां छे” सवाल जवाबासह पांड्याचं अगदी थाटात स्वागत होईल, यात शंका नाही.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सगुजरात टायटन्स