IPL 2025 GT vs MI : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील नवव्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिलनं साई सुदर्शनच्या साथीनं डावाची सुरुवात केली. या दोघांनी दमदार सुरुवात करून देत मुंबईच्या गोलंदाजांचे खांदे पाडल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हार्दिक पांड्यानं फोडली सेट झालेली सलामीची जोडी
हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला अन् त्याने शुबमन गिलच्या रुपात संघाला पहिले यश मिळवून दिले. तो २७ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावा करून नमन धीरच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. शुबमन गिलनं युवा साई सुदर्शनच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली होती. त्यामुळे ही विकेट मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा दिलासा देणारी होती.
GT vs MI : पांड्या भाऊसाठी 'अच्छे दिन'! “केम छो? मजा मां छे”... सवाल-जवाबासह 'हार्दिक' स्वागताची घडी
रोहित फिल्डिंग सेट केली, अन् हार्दिकच्या खात्यात जमा झाली पहिली विकेट
शुबमन गिल या विकेट्स आधी
रोहित शर्मा हार्दिक पांड्याला फिल्डिंग सेटअपमध्ये मदत करताना दिसून आले. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या खात्यात विकेटही जमा झाली. सोशल मीडियावर ही गोष्ट चर्चेचा विषय ठरत आहे. हार्दिक पांड्या हा गतवर्षीपासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसतोय. त्याने
रोहित शर्माची जागा घेतल्यामुळे गत हंगामात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये दोन गट पडल्याचेही पाहायला मिळाले होते.
पांड्या कॅप्टन झाल्यावर MI चाहत्यांमध्ये पडले होते दोन गट, पण... टी-२० वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळाले. त्याने टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिकाही बजावली अन् याच गोष्टींमुळे गत हंगामात जे काही पाहायला मिळाले त्यावर पडदा पडला. रोहित शर्मा कर्णधार नसला तरी त्याच्या नेतृत्वाचा अनुभव मुंबई इंडियन्ससाठी होतोय, हे पुन्हा एकदा दिसून आले.
Web Title: IPL 2025 GT vs MI Rohit Sharma Helped Hardik Pandya Field Set Up And Shubman Gill Wicket Came In The Next Over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.